Goa Transport News Dainik Gomantak
गोवा

Rent a Cab Goa: बेशिस्‍त ‘रेंट अ कॅब’ चालकांना ‘दे धक्‍का'; विमानतळ, रेल्वे स्टेशन परिसरातील मनमानीला चाप

Goa Transport Rules: परवानगी नसलेल्या ठिकाणी टॅक्सी स्टँड्स उभारल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोवा राज्यात भाड्याने टॅक्सी देणाऱ्या व्यावसायिकांवर परिवहन विभागाकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार परवानगी नसलेल्या ठिकाणी टॅक्सी स्टँड्स उभारल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी अनेक टॅक्सी चालक प्रवाशांना सेवा देतात पण त्यांच्याकडे आवश्यक परवानगी नसते, यामुळे नियमांचे उल्लंघन होते, असे परिवहन विभागाने म्हटले आहे.

वर्ष १९८९ मध्ये जारी केलेल्या कायद्याच्या नुसार रेंट अ कॅब योजनेअंतर्गत काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, टॅक्सी चालकांना त्यांचा व्यवसाय परवान्यात नमूद केलेल्या ठिकाणीच ठेवणं भाग आहे.

परिवहन विभागाची परवानगी घेतल्याशिवाय दुसरीकडे हा व्यवसाय सुरु करता येत नाही आणि या कायद्यानुसार आता नियमांचे उल्लंघन झाल्यास टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा विभागाने दिला आहे.

विमानतळ किंवा रेल्वे स्थानकांवर अनेक टॅक्सी चालक परवानग्या नसताना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्रवाशांना मनमानी भाड्याचा सामना करावा लागतो, तसेच अनेक वेळा प्रवाशांची गैरसोय होते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाने ही कठोर भूमिका घेतली आहे.

भाड्याने टॅक्सी चालवण्यासाठी केंद्र सरकारच्या मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत परवानगी घ्यावी लागते. हा परवाना मिळवण्यासाठी ऑपरेटर किंवा असोसिएशनकडे किमान ५० मोटार कॅब असणे आवश्यक आहे. सध्या गोवा सरकारकडून असे ५,९७२ परवाने देण्यात आले आहेत. तरीही अनेक चालक नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करत असल्याने सरकारने कठोर भूमिका घेतली असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG 4th Test: अभिनंदन केएल राहुल! इंग्लंडमध्ये केला पुन्हा नवा पराक्रम; 'या' दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

स्वप्न नव्हे, सत्य! आता 100 वर्षे जगा, साठीतही घ्या तरुणाईचा अनुभव; 'हे' 5 उपाय आहेत फायदेशीर, वैज्ञानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT