Goa Traffic Police News:  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic News: ट्रॅफिक पोलिसांना पाहताच दुचाकीवरील तरूणाचा यु टर्न; पण पोलिसांनाच जाऊन धडकला... गाडीत बीअरचा कॅन

पणजी स्टँड परिसरातील प्रकार

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Traffic Police News: पणजी स्टँड परिसरात रविवारी एक मजेशीर प्रकार घडला. येथील चौकात ट्रॅफिक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. तेव्हा एका बाजूने आलेल्या तरूणाने ट्रॅफिक पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. या नादात तो एका ट्रॅफिक पोलिसालाच जाऊन धडकला. आणि पडला. अखेर पोलिसांनीच त्याला उचलून सुरक्षित स्थळी आणले.

या किरकोळ अपघातात तरूणाच्या गाडीचे थोडेफार नुकसान झाले आहे तसेच त्यालाही थोडेफार खरचटले आहे. दरम्यान, त्याच्या दुचाकीच्या पुढील कप्प्यात बीअरचा कॅन आढळून आला आहे. या तरूणानेही थोडेफार मद्यप्राशन केल्याचा संशय आहे.

गेल्या काही काळात गोव्यात ड्रंक अँड ड्राईव्हचे अनेक प्रकार समोर आले आहेत. बाणास्तरीतील अपघातानंतर तर गोव्यात याविरोधात जोरजोरात बोलले जात आहे. त्यातून पोलिसांवरही ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाईचा मोठा दबाव आहे.

पोलिस कारवाईच्या भीतीनेच हा तरूण घाबरला असण्याची शक्यता आहे. त्यातून त्याने गाडी वेगाने चालवण्याच्या नादात पोलिसाला धडक दिली. दरम्यान, तो स्थानिक तरूण असून आता पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT