Goa NSUI: ते दहा लाख रूपये ABVP कडून वसूल करा अन्यथा... NSUI ने दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

विद्यार्थी निवडणुकीत मुख्यमंत्री हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप; एबीव्हीपीचेही प्रत्युत्तर
Goa NSUI Naushad Chowdhari
Goa NSUI Naushad ChowdhariDainik Gomantak
Published on
Updated on

Goa NSUI News: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) संघटनेला दहा लाख रूपये दिल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ते दहा लाख रूपये परत घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने दिला आहे.

ABVP ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी संलग्न असलेली उजव्या विचारांची विद्यार्थी संघटना आहे. एबीव्हीपीने विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी, विद्यापीठाच्या निवडणुकांवेळी जातीय द्वेष भडकवण्यासाठी, कॅम्पसमध्ये गोंधळ घालण्यासाठी हे पैसे वापरल्याचा आरोप एनएसयूआयने केला आहे.

Goa NSUI Naushad Chowdhari
Bhoma Highway Protest: बायपास आमका जाय..! महामार्ग रूंदीकरणाविरोधात एकवटले भोमावासीय

महाविद्यालयीन निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू नयेत यासाठी अभाविपचे एजंट विद्यार्थ्यांना धमकावत असल्याच्या अनेक तक्रारी अनेक महाविद्यालयांमधून येत आहेत, 2020 ते 2023 या काळात ABVP ला प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठी 10 लाख रुपये दिले गेले होते. हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे.असे एनएसयूआयचे राज्याचे अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले.

राज्य सरकारनेही या संघटनेला दहा लाख रूपये दिल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील माहिती आणि प्रचार विभागाने (DIP) बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगास यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली होती.

NSUI ने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनाही ABVP कडून पैसे वसूल केले जातील, याची खात्री करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांना फोन करून विद्यार्थी निवडणुकीत थेट हस्तक्षेप करत असल्याचेही एनएसयूआयने राज्यपालांना सांगितले आहे.

Goa NSUI Naushad Chowdhari
Ganjem Temple Theft: गांजे येथील गांजेश्वरी, शांतादुर्गा मंदिरात चोरी; फंडपेटी फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि गोव्याचे प्रभारी एरिक स्टीफन म्हणाले की, मुख्यमंत्री सावंत जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अभाविपला सरकारी निधी देत आहेत. गोव्याला पुढचा मणिपूर करायचे आहे का?

विद्यार्थी म्हणून आम्हाला भीती वाटते कारण गुंडांना कॅम्पसमध्ये पाठवले जात आहे आणि विद्यार्थ्यांना धमकावले जात आहे. विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करत आहे.

एबीव्हीपीचा पलटवार

दरम्यान, NSUI ने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. अभाविपच्या बँक खात्यात सरकारकडून कोणतेही पैसे आलेले नाहीत. गोवा विद्यापीठ निवडणुकीत NSUI ने DSW सोबत संगनमत करून आपले बॅकलॉग असलेल्यांचे फॉर्म वैध करून घेतले.

तसेच DSW सोबत संगनमत करून निवडणुकीत घोटाळा केला. निवडणूक रद्द होण्यास NSUI जबबदार आहे, असा आरोप एबीव्हीपीच्या गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com