Bicholim  Daink Gomantak
गोवा

Goa: डिचोलीतील वाहतूक कोंडी नियंत्रणात

बेशिस्त पार्किंग (Parking) विरोधात वाहतूक पोलिसांनी (Police) मोहीम हाती घेतल्याने डिचोली शहरातील (Bicholim) विशेष करून बाजारातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रकार तूर्त तरी टळले आहेत.

Manish Jadhav

डिचोली: बेशिस्त पार्किंग (Parking) विरोधात वाहतूक पोलिसांनी (Police) मोहीम हाती घेतल्याने डिचोली शहरातील (Bicholim) विशेष करून बाजारातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रकार तूर्त तरी टळले आहेत. डिचोली शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. अधूनमधून बाजार परिसर तसेच शहरातील ठराविक भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. सध्या पावसाळा असल्याने तर हे प्रकार वाढत आहेत. शहरातील कदंब बसस्थानकाकडून (Kadamba bus stand) बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर विशेष करून साप्ताहीक बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते.

गृहरक्षक तैनात

बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत असते. वाहतूक पोलिसांनी मागील आठवड्यापासून पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई हाती घेतली आहे. अधूनमधून बेशिस्तपणे पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांच्या टायरांना लॉक लावण्यात येत आहे. बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर 'फातिमा' शोरूमजवळ गृह रक्षकही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास बाजारातील वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT