Jeffrey Epstein Death: जेफ्री एपस्टीनचा मृत्यू आत्महत्या नव्हे, तर खून होता! 7 वर्षांनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ; पाठीमागून हल्ला करुन गळा आवळल्याचा संशय

Jeffrey Epstein Death Forensic Expert Murder Claim: जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या जेफ्री एपस्टीन प्रकरणाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा गौप्यस्फोट झाला.
Jeffrey Epstein Death Forensic Expert Murder Claim:
Jeffrey Epstein DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Jeffrey Epstein Death Forensic Expert Murder Claim: जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या जेफ्री एपस्टीन प्रकरणाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा गौप्यस्फोट झाला. अब्जाधीश आणि अल्पवयीन मुलींच्या यौन तस्करी प्रकरणातील दोषी जेफ्री एपस्टीनचा मृत्यू आत्महत्येमुळे नसून तो सुनियोजित हत्या होता, असा खळबळजनक दावा एका प्रसिद्ध फॉरेन्सिक तज्ज्ञाने केला.

बीबीसी न्यूजनाइट'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत जगप्रसिद्ध फॉरेन्सिक तज्ज्ञ प्रोफेसर मायकेल फ्रीमन यांनी न्यूयॉर्कच्या मेडिकल एक्झामिनरच्या फाईल्स आणि पोस्टमार्टम रेकॉर्ड्सचा सखोल अभ्यास केल्यानंतर हा दावा केला. त्यांनी स्पष्ट केले की, एपस्टीनच्या गळ्यावर आणि शरीरावर आढळलेल्या खुणा पाहता पाठीमागून हल्ला करुन गळा दाबून हत्या करण्यात आली असावी असे प्राथमिकदृष्ट्या दिसते. विशेष म्हणजे, या खुलाशाने 2019 च्या पोस्टमार्टम रिपोर्टवर सवाल उपस्थित केला.

Jeffrey Epstein Death Forensic Expert Murder Claim:
America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

जेफ्री एपस्टीन 10 ऑगस्ट 2019 रोजी न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृतावस्थेत सापडला होता. त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंगचे गंभीर गुन्हे दाखल होते आणि त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूस त्यावेळी आत्महत्या घोषित करण्यात आले होते. सुरुवातीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये एपस्टीनच्या मृत्यूस सुसाइड म्हटले गेले होते आणि बचावाचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, मिनेसोटा येथील चर्चित जॉर्ज फ्लॉयड प्रकरण यशस्वीरीत्या सोडवणारे फॉरेन्सिक एक्सपर्ट प्रोफेसर फ्रीमन यांनी या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Jeffrey Epstein Death Forensic Expert Murder Claim:
America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

एपस्टीन हा अमेरिकन फाइन्सर होता आणि 2005 पासून अल्पवयीन मुलींच्या यौन तस्करीचे मोठे रॅकेट चालवत असल्याच्या गुन्ह्यात 2008 व नंतर जुलै 2019 मध्ये अटकेत होता. या सगळ्या काळ्या धंद्यात ब्रिटिश सोशलाइट ग्लेन मॅक्सवेल त्याला मदत करत होती, जिच्यावरही कायदेशीर कारवाई झाली. मात्र आता या नव्या फॉरेन्सिक दाव्यामुळे एपस्टीनच्या रहस्यात्मक मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Manipur Ukhrul District Violence Four Naga Killed
Goa Suspicious Death Case
Mandovi Bridge Accident
Satarda Mother Son Death