भारताने तुर्कीची केली बोलती बंद! आंतरराष्ट्रीय मंचावर पोलखोल करत सुनावले खडे बोल; UN मधील राजनैतिक संघर्ष शिगेला VIDEO

India Opposes UN OIC Cooperation Resolution Turkey: संयुक्त राष्ट्र आणि इस्लामिक सहयोग संघटनेमधील सहकार्याशी संबंधित एका वादग्रस्त प्रस्तावावरुन भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीला खडे बोल सुनावले.
India Opposes UN OIC Cooperation Resolution Turkey
India Opposes UN OIC Cooperation Resolution TurkeyDainik Gomantaki
Published on: 
Updated on: 

India Opposes UN OIC Cooperation Resolution Turkey: संयुक्त राष्ट्र आणि इस्लामिक सहयोग संघटनेमधील सहकार्याशी संबंधित एका वादग्रस्त प्रस्तावावरुन भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीला खडे बोल सुनावले. इराकमध्ये मांडण्यात आलेल्या आणि तुर्कीच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावाला नुकतीच यूएन जनरल असेंबलीने मंजुरी दिली असली, तरी भारतासह अमेरिका, इस्रायल, ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया या 6 देशांनी याच्या विरोधात मतदान केले.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या (India) उप स्थायी प्रतिनिधी, राजदूत योजना पटेल यांनी आरोप केला की, या प्रस्तावाचा मसुदा तयार करताना OIC च्या स्थायी पर्यवेक्षक मिशनने भारतासह अनेक सदस्य देशांना जाणीवपूर्वक प्रक्रियेतून बाहेर ठेवले. पारदर्शकतेचा अभाव आणि वारंवार विनंती करुनही दुर्लक्ष करणे ही कोणतीही तांत्रिक चूक नसून एक सुनियोजित कारस्थान असल्याचा घणाघात भारताने केला.

India Opposes UN OIC Cooperation Resolution Turkey
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! बस-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; 11 जणांचा मृत्यू, 33 प्रवासी गंभीर जखमी VIDEO

या प्रस्तावामधील आक्षेपार्ह मुद्यांवर बोट ठेवत भारताने जुलैमध्ये इस्लामाबाद येथे झालेल्या 'महिलांवर OIC मंत्रिस्तरीय संमेलना'च्या संदर्भांना स्पष्टपणे फेटाळून लावले. भारताने ठणकावून सांगितले की, OIC ला भारताच्या अंतर्गत बाबींवर किंवा जम्मू-कश्मीरवर भाष्य करण्याचा कोणताही नैतिक वा कायदेशीर अधिकार नाही. पाकिस्तानचे नाव न घेता भारताने फटकारले की, 57 देशांच्या या मंचाचा गैरवापर भारताविरुद्ध प्रचारासाठी केला जात आहे.

India Opposes UN OIC Cooperation Resolution Turkey
''आता मग देशात एक आठवड्याची सुट्टी जाहीर करा!'', भारताविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी PM ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतलं चांगलंच फैलावर

विशेष म्हणजे, या पारदर्शकतेच्या अभावावर आक्षेप घेणारा भारत हा एकमेव देश नव्हता, तर सायप्रस, ग्रीस आणि युरोपियन युनियनतर्फे आयरलँडने देखील तुर्कीच्या मनमानी कारभारावर आक्षेप नोंदवला. अमेरिकेने देखील भविष्यात अशा वादांना फाटा देऊन केवळ व्यावहारिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे जागतिक राजकारणात तुर्कीची मोठी कोंडी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.