Goa Traffic Fines Gomantak Digital Team
गोवा

Goa Traffic Case : गत अडीच महिन्यांत एक लाख बेशिस्त चालकांविरुद्ध कारवाई

5.77 कोटींचा दंड वसूल : सव्वाचार वर्षांत18 हजार परवाने निलंबित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Case : राज्यात वाहन चालकांमध्ये मोटार वाहन कायद्याचे पालन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही 2023 च्या सुरवातीच्या अडीच महिन्यांत सुमारे एक लाख वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कायद्यात दुरुस्ती झाल्याने दंडाची रक्कम वाढली असून या काळात 5 कोटी 77 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहन चालकांमध्ये नियमांची जनजागृती करण्याची धडक मोहीम गेल्या महिन्यात वाहतूक पोलिस तसेच जिल्हा पोलिसांनी संयुक्तपणे सुरू केली होती.

हेल्मेट सक्ती, चारचाकी वाहनांना सीट बेल्ट वापरण्यासंदर्भात जागृती केली होती. त्यानंतर वाहन चालकांना चलन देण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रमुख रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी स्पीड गन तसेच वाहतूक सिग्नल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मेरशी येथील जंक्शनवर अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे.

  • वर्षातील अपघात व भीषण अपघात नोंद

एकूण अपघात भीषण अपघात वर्ष

3440 281 2019

2851 218 2021

625 79 2023

2375 216 2020

3011 256 2022

  • वाहनांविरुद्ध चलन व दंडाची रक्कम

चलन प्रकरणे दंडाची रक्कम वर्ष

9.09 लाख 10.65 कोटी 2019

7.85लाख 8.86 कोटी 2020

7.33 लाख 8.54 कोटी 2021

4.90 लाख 19.76 कोटी 2022

98 हजार 5.77 कोटी 2023

पोलिसांचीही कसरत

राज्यातील वाहनांची संख्या लोकसंख्याच्या जवळपास पोहचली आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांनाही कसरत करावी लागत आहे. तर गतवर्षी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती होऊन दंडात्मक रक्कमेत वाढ झाली आहे. त्यामुळे 2022 पासून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात दंड रुपी महसूल जमा होत आहे.

एकूण 53 कोटी रुपये दंड

गेल्या सव्वाचार वर्षांत 30 लाख वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक करवाई करताना एकूण 53 कोटी रुपये महसूल दंडाच्या स्वरुपात वसूल केला आहे. तसेच या काळात 18 हजार वाहनांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT