Fraud Case : ठकसेन समीरकडून 5 कोटींचा गंडा; युवकांची फसवणूक

नोकरीचे आमिष, तक्रारदारांची पोलिसांत गर्दी
Fraud Case
Fraud CaseDainik Gomantak

राज्य सरकारमधील आयएएस अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून डिचोली येथील समीर धावस्कर याने अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

पणजी पोलिसांनी त्याला एका फसवणुकीच्या प्रकरणात गजाआड केल्यानंतर अनेकांनी पणजी पोलिस स्थानकात गर्दी केली आहे. या संशयिताने विविध खात्यातील पदावर नोकरी देण्यासाठी राज्यभरातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांना गंडा घातला आहे. ही गंडा घातलेली रक्कम 5 कोटींच्या वर आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पणजीत एका तारांकित हॉटेलसाठी वाहन कंत्राट पद्धतीवर लावतो असे सांगून १०.५५ लाखांची समीर धावस्कर व त्याचा साथीदार दिनकर सावंत या दोघांनी कटकारस्थान करून तक्रारदाराची फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलिसांत दाखल झाली होती.

Fraud Case
Goa G20 Meetings: राज्यात G20 बैठकीआधी सौंदर्यीकरणाला वेग; लावणार 50,000 रोपे...

याप्रकरणी त्या दोघांना अटक केल्यावर चौकशीत त्याने काहींना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले आहे असे सांगितले होते. त्यामुळे आत्तापर्यंत पोलिसांनी १६ उमेदवारांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. या जबान्यांनुसार काहींनी ज्या ठिकाणी पैसे संशयित समीर धावस्कर याला दिले आहेत, त्या क्षेत्रातील पोलिस स्थानकात तक्रारी नोंद करण्यात येणार आहेत.

पणजी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संशयित समीर धावस्कर याच्या खऱ्या चेहऱ्याचा पर्दाफाश झाल्याने फसवणूक झालेल्या युवकांनी पणजी पोलिसांत कालपासून धाव घेतली आहे. पणजी पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीत सध्या दोघेही संशयित पोलिस कोठडीत आहेत.

उपनिरीक्षकपदासाठी १८ ते २५ लाख!

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित समीर धावस्कर याने आएएएस अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून विविध सरकारी खात्यातील शिपाईपासून ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या नोकरीसाठी रोख रक्कम घेतल्या आहेत.

उपनिरीक्षकपदासाठी त्याने १८ ते २५ लाख रुपये घेतले होते. मात्र, उपनिरीक्षकाची नोकरी न मिळाल्याने संबंधित उमेदवाराने त्याचा शोध सुरू केला होता. तो घरी किंवा मोबाईलवर संपर्कात सापडत नव्हता. लोकांनी त्याची पार्श्‍वभूमीची पडताळणी न करताच त्याला रोख रक्कम सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com