Health Review Meeting : वाढती कोरोना रुग्णसंख्या, G-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आढावा

लवकरच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जीनोम सिक्वेन्सिंग मशीन कार्यांन्वित करण्यात येणार
Health Review Meeting
Health Review Meeting Dainik Gomantak
Published on
Updated on

Health Review Meeting : कोविडसह सर्व प्रकारच्या विषाणूंचे नवीन प्रकार शोधण्यासाठी बांबुळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जीनोम सिक्वेन्सिंग मशीन कार्यांन्वित करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी GMCच्या टीमला दिली आहे.

गोव्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत चालली आहे. ही मशीन सुरू झाल्यानंतर राज्यात विषाणूचे प्रकार शोधण्यास मदत होणार आहे. याबाबतची माहिती मंत्री राणे यांनी ट्विट करीत दिली.

Health Review Meeting
Raigad: पोटासाठी येत होता गोव्याला... भूक लागली म्हणून खाली उतरला, रायगडमध्ये घडले असे की जीव गमावला

राणे म्हणाले, मी गोमेकॉच्या टीमला जीनोम सिक्वेन्सिंग मशीन कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या सुरू केल्या आहेत. आवश्यक असल्यास, आरटीपीसीआर चाचणी केली जाते आणि जीनोम प्रोटोकॉल आणि एसओपीनुसार केली जाते.

तसेच जर कोणालाही बूस्टर म्हणून किंवा प्रवासाच्या उद्देशाने लसीकरणाची आवश्यकता असल्यास लीसीकरणाचीही सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Health Review Meeting
Shacks in Konkan: पर्यटनात महाराष्ट्र देतोय गोव्याला फाईट; आता कोकणातील बीचवर उभारणार शॅक्स

दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची सद्यस्थिती आणि त्यासाठी ग्राउंड स्तरावरील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित परिषदेला आरोग्यमंत्री राणे यांनी उपस्थित लावली.

यावेळी आरोग्यमंत्री राणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राणेंनी गोव्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला, कोरोना चाचणीच्या आकडेवारीबद्दल माहिती दिली आणि गोव्यात दर दशलक्ष लोकांमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली गोवा पुन्हा एकदा कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज झाला आहे तसेच मागील कोरोनाकाळातील अनुभवांच्या जोरावर कठोर उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

तसेच G20 परिषदेच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी 10 आणि 11 एप्रिल रोजी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com