New Rent A cab Permits Suspended Dainik Gomantak
गोवा

Goa Rent A Cab: राज्यात रेंट-अ-कॅबसाठी नवीन वाहतूक परवाने बंद, वाहतूक प्राधिकरणाचा मोठा निर्णय!

New Rent A cab Permits Suspended: गोव्यात रस्ते सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायद्याच्या पालनाच्या दृष्टीने राज्य वाहतूक प्राधिकरणाने (एसटीए) मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Goa Traffic Authority Suspends New Rent-a-Cab Permits for Road Safety

पणजी: गोव्यात रस्ते सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायद्याच्या पालनाच्या दृष्टीने राज्य वाहतूक प्राधिकरणाने (एसटीए) मोठा निर्णय घेतला आहे. रेंट-अ-कॅब योजना 1989 अंतर्गत पुढील सूचनेपर्यंत कोणताही नवीन रेंट-अ-कॅब परवाना किंवा परवानगी जारी केली जाणार नाही, अशी माहिती वाहतूक संचालनालयाने दिली आहे.

गोमंतकीयांनी सहकार्य करावे

दरम्यान, हा निर्णय रस्ता सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि कायद्याचे पालन यांना प्राधान्य देत घेण्यात आला आहे. नागरिकांनी या निर्णयाचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अपघातांमध्ये वाढ

भाडेपट्टीवर उपलब्ध असलेल्या दुचाकी/चारचाकी वाहने स्वतः चालवताना होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटकांकडून (Tourists) निष्काळजीपणे आणि मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालविण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे गंभीर अपघात आणि जखमा होण्याच्या घटना वाढल्या आहेत असे वाहतूक संचालनालयाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. एसटीएच्या निर्णयानुसार, नागरिकांना रेंट-अ-कॅब परवाना किंवा परवानगीसाठी कोणताही नवीन अर्ज न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT