Rent a Cab Goa: "आठ दिवसांत नोटीस मागे घ्या किंवा परिणामांना सामोरे जा";रेंट-अ-कॅब व्यावसायिकांचा परिवहन विभागाच्या आदेशाला विरोध

Goa Transport Rules: रेंटल गाड्यांसाठी निर्बंध लावण्यात आला होता मात्र या निर्णयाशी सहमत नसल्याने रेंट-अ-कॅब असोसिएशनने उपसंचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे
Rent a Cab Association
Rent a Cab AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा राज्यात भाड्याने टॅक्सी देणाऱ्या व्यावसायिकांवर परिवहन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. परवानगी नसलेल्या ठिकाणी टॅक्सी स्टँड्स उभारल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला होता, तसेच रेल्वे स्थानक किंवा विमानतळांवर रेंटल गाड्यांसाठी परवानगी नसताना व्यवसाय करण्यावर निर्बंध लावण्यात आला होता मात्र आता या निर्णयाशी सहमत नसल्याने रेंट-अ-कॅब असोसिएशनने उपसंचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.

रेंट-अ-कॅब असोसिएशनचा भाग असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०१९ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार रेंटल कॅबचा व्यवसाय हा कुठेही करता येणं शक्य आहे. मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली गेली आहे मात्र रेंट-अ-कॅब चालवणाऱ्या व्यवसायीकांना अशा ठिकाणी व्यवसाय करू देत नाही आणि हा त्यांच्यावर होणारा अन्यायच आहे.

Rent a Cab Association
Rent a Cab Goa: बेशिस्‍त ‘रेंट अ कॅब’ चालकांना ‘दे धक्‍का'; विमानतळ, रेल्वे स्टेशन परिसरातील मनमानीला चाप

टॅक्सी चालकांप्रमाणेच आम्ही देखील ऑनलाईन ऑर्डर स्वीकारून ग्राहकांना गाड्या देतो असं कर्मचारी म्हणाले आहेत. मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांचा देखील काउंटर नाहीये आणि म्हणून सर्वांसाठी सामान कायदा बनवत त्यांना देखील हटवण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केलीये.

रेंट-अ-कॅबचा व्यवसाय करत आम्ही बेकायदेशीर काम करत नाही आहोत, सर्व कायद्याचे पालन करूनच आम्ही व्यवसाय करतोय आणि तरीही जर का असा अन्याय होतच राहिला तर मग टॅक्सी चालक आणि रेंट-अ-कॅब व्यावसायिक यांच्यात नक्कीच भांडणं होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

परिवहन विभागाकडून काहीही माहिती न देता अचानक निर्णय जारी करण्यात आला आहे. कायद्यानुसार रेंट-अ-कॅब असोसिएशनला राज्यात कुठेही वाहन भाड्याने देण्याचा अधिकार आहे. सध्या असोसिएशनने परिवहन विभागला ही नोटीस मागे घेण्यासाठी ८ दिवसांचा अवधी दिलेला असून कायदा आणि सुव्यवस्थेसह परिणामांना सामोरे जावे लागेल अशी इशारा देखील असोसिएशन कडून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com