Goa Stunt Video Dainik Gomantak
गोवा

गोव्याची सैर की जिवाशी खेळ? हरमल बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांची स्टंटबाजी, चालत्या कारच्या दरवाज्यावर बसून डान्स

Goa Stunt Video: गोवा हे जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर समुद्रकिनारे, निसर्गरम्य रस्ते आणि खुलं वातावरण पाहून अनेक पर्यटक आकर्षित होतात.

Sameer Amunekar

गोवा हे जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर समुद्रकिनारे, निसर्गरम्य रस्ते आणि खुलं वातावरण पाहून अनेक पर्यटक आकर्षित होतात. मात्र याच वातावरणाचा गैरफायदा घेत काहीजण धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. अशाच एका प्रकारामुळे हरमल समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हरमल बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही तरुण पर्यटकांनी त्यांच्या वाहनांतून धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाडीच्या दरवाज्यावर बसंणं, हात बाहेर काढणं असे गंभीर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले.

अशा स्टंटमुळे केवळ त्या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांच्याही सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. हरमल आणि आसपासच्या भागात पर्यटकांची संख्या सतत वाढत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि नियमभंगाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

हरमल समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नियमित गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,असी मागणी होत आहे. अशा प्रकारांमुळे गोव्याची प्रतिमा खराब होतेय.

गोव्यात पर्यटन हंगाम सुरू असताना अशा घटनांनी सुरक्षा व्यवस्थेची परीक्षा लागली आहे. दरम्यान, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी येथील नियन पाळणं गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काणकोणातील 'दिवज' परंपरा धोक्यात, समिती अहवाल सरकारदरबारीच; कारवारहून दिवजांची आयात

'AI' आभाळाला भिडलं तरी 'गुरु'ची जागा घेणार नाही; अमेरिकेतील वैमानिकांच्या 'त्या' प्रयोगातून जगाला मिळाला मोठा धडा!

Anil Chaudhry Dance: "गोली तो चलेगी!" अंपायर अनिल चौधरींचा कडक स्वॅग; 'या' व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

बोर्डे, डिचोली येथे बुधवारी 'होमकुंड' उत्सव, तयारी पूर्ण; वडेश्वर देवाच्या प्रांगणात भरणार उत्सव, व्रतस्थ भक्तगण करणार अग्निदिव्य

Goa Shigmotsav: पणजीत शिमगोत्सवाचा जल्लोष; शनिवारी बांदोडकर मार्गावरून निघणार रोमटामेळ, चित्ररथ मिरवणूक

SCROLL FOR NEXT