काणकोणातील 'दिवज' परंपरा धोक्यात, समिती अहवाल सरकारदरबारीच; कारवारहून दिवजांची आयात

Canacona Divaj tradition Goa: गोव्याचे सांस्कृतिक प्रतीक मानले जाणारे ‘दिवज’ आज काणकोणात स्थानिक पातळीवर तयार होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
Canacona Divaj tradition Goa
Canacona Divaj tradition GoaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गोव्याचे सांस्कृतिक प्रतीक मानले जाणारे ‘दिवज’ आज काणकोणात स्थानिक पातळीवर तयार होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. स्थानिक हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी नेमलेल्या समित्यांनी आपले अहवाल सरकारकडे सादर केले असले तरी त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी दोन-तीन वर्षे समितीवर काम केलेल्या सदस्यांनी व्यक्त केली.

काणकोण तालुक्यात काही वाड्यांना ‘कुंभार वाडा’ म्हणून ओळखले जात असले तरी सध्या दिवज निर्मिती करणारे कुंभार अभावानेच आढळतात. हीच अवस्था इतर पारंपरिक व्यवसायांचीही आहे.

Canacona Divaj tradition Goa
Goa Politics: 'आप’च्‍या 'ऑफर'वर अद्याप आपण विचारच केलेला नाही! नावेलीतून वालंका निवडणूक लढविणारच - चर्चिल आलेमाव

महाशिवरात्रीनंतर तालुक्यात जत्रोत्सवांना प्रारंभ होतो. गुळ्ळे, लोलये, खोला ते खोतीगाव परिसरातील विविध देवालयांत दिवजोत्सवासाठी नवीन मातीच्या दिवजांची गरज भासते. दरवर्षी सुमारे एक हजार दिवजांची विक्री या उत्सवासाठी होत असून, यंदा एका दिवजाची किंमत तीनशे ते चारशे रुपये आहे.

Canacona Divaj tradition Goa
Goa Bus Safety Rules: सार्वजनिक बससेवेसाठी आता सुरक्षा नियम कडक, खात्याकडून सूचना जारी; नियमांचे पालन न करण्यावर होणार कारवाई

मात्र, काणकोणात एकही कुंभार दिवज तयार करत नसल्याने हे दिवज कारवार जिल्ह्यातून विक्रीस आणले जातात, ही खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेले दिवज स्थानिक पातळीवर तयार व्हावेत आणि पारंपरिक कुंभार व्यवसायाला नवसंजीवनी मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com