Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: लवकरच 'GTDC' कडून पोलिसांना मिळणार 'Thar'

Goa Police: किनारी भागातही वापरता येऊ शकणारी महिंद्राची 'थार' ही चारचाकी कार दणकट आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाने जीटीडीसी (GTDC) पर्यटक पोलिसांसाठी महिंद्रा कंपनीची ‘थार' ही वाहने पाच वर्षांसाठी भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी खात्याने ई-निविदा काढलेली आहे.

किनारी भागातही वापरता येऊ शकणारे महिंद्राचे थार हे चारचाकी वाहन दणकट आहे. त्यासाठी ती वाहने खरेदी न करता पाच वर्षांच्या भाडेकरारावर घेणेच अधिक पसंती जीटीडीसीने दाखविल्याचे दिसते. ज्या वाहन सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसाठी ही निविदा असल्याने त्यांना 25 तारखेपर्यंत ही निविदा सादर करणे आवश्‍यक आहे. यापूर्वी पोलिस (Police) खात्याने काही पोलिस स्थानकांना ही वाहने दिलेली आहेत.

वाहन खरेदी करण्यापेक्षा भाड्याने वाहने घेण्यात जीटीडीसीला अधिक रस दिसत आहे. यापूर्वी 2019 मध्ये दोन ट्रेर्रीन वाहने कोट्यवधी रुपये घेऊन किनाऱ्यावरील गस्तींसाठी पोलिसांना दिली होती. त्या वाहनाची अवस्था पुढे काय झाली, हे खात्यातील अधिकाऱ्यांना चागलेच माहीत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही वाहने शिवोली (Siolim) किनारी पोलिसांकडे असून, त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्याशिवाय या वाहनांविषयी विधानसभेत प्रश्‍नही उपस्थित झाला होता. भाड्याने वाहने घेतल्याने त्यांचा करार संपल्यानंतर ते वाहन परत केल्यानंतर खात्याची जबाबदारी संपणार आहे. त्यामुळेच भाडेकराराकडे महामंडळ वळलेले दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT