Chorla Ghat: 'चोर्ला घाट' रस्त्याच्या कामासाठी आम्ही प्रयत्नशील- मुख्यमंत्री सावंत

Chorla Ghat: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak
Published on
Updated on

Chorla Ghat: बेळगाव ते गोव्यादरम्यानच्या चोर्ला घाटातील हा रस्ता तासभराचा आहे. सध्या रस्ता खराब झाल्याने प्रवासाला दोन तासांचा वेळ लागत आहे. हा रस्ता सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत असून, याची प्रक्रिया सुरू आहे. यासबंधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याशी चर्चा करणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिले.

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (Chamber of Commerce and Industries) उद्यमबाग येथील कार्यालयाला मुख्यमंत्री सावंत यांनी काल शनिवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘‘चोर्ला घाटातील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे दिला आहे. त्यामुळे पुढील दोन ते अडीच वर्षात हा रस्ता होईल.

Chorla Ghat
Goa Chorla Ghat News: चोर्ला घाटात 'अवजड' वाहनांची पुन्हा गर्दी!

तसेच, या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खूप लाभ होणार आहे. यासंबंधी मी कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आपण सर्वांनी पाठपुरावा करुन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.’’

बेळगावातून गोव्यात व गोव्यातून बेळगावात अनेक वस्तूंची आयात व निर्यात केली जाते. यासाठी रस्त्याचा विकास महत्वाचा आहे. बेळगावात सुसज्ज विमानतळ असल्यामुळे येथील उद्योजकांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यास सोपे आहे.

बेळगावात अनेक गुंतवणूकदार येतात. यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. आझादी का अमृतमहोत्सवनिमित्त आपल्यासाठी पुढील २५ वर्षे खूप महत्वाची आहेत. आपल्याला जागतिक पातळीवर देशाचे नाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घालून दिलेल्या संकल्पनेनुसार काम केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com