Goa Tourism Dainik Gomanatak
गोवा

Goa Tourism: गोवा पर्यटनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा, 'उत्कृष्ट एमआयटीटी कमबॅक' पुरस्कार प्रदान

Prestigious MITT Comeback Award: मॉस्को आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन प्रदर्शनात (एमआयटीटी) गोवा पर्यटनाला प्रतिष्ठित अशा ‘एमआयटीटी कमबॅक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मॉस्को आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन प्रदर्शनात (एमआयटीटी) गोवा पर्यटनाला प्रतिष्ठित अशा ‘एमआयटीटी कमबॅक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राज्याच्या पर्यटन उत्कृष्टतेसाठीच्या समर्पणाला अधोरेखित करतो. गोवा पर्यटनाने अलीकडेच मॉस्को येथील क्रोकस एक्स्पो येथे झालेल्या ‘एमआयटीटी’ मध्ये भाग घेतला होता.

गोवा पर्यटनाच्यावतीने पर्यटन विभागाचे साहाय्यक संचालक प्रदीप बिन्नर आणि जीटीडीसीचे मार्केटिंग व्यवस्थापक हरीश साटेलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एमआयटीटी २०२५ मध्ये गोवा पर्यटनाच्या सहभागात गोवा सरकारचे पर्यटन सचिव श्री संजीव आहुजा, आयएएस, तसेच पर्यटन खात्याचे सहाय्यक संचालक श्री प्रदीप बिन्नर; जीटीडीसीचे मार्केटिंग व्यवस्थापक श्री हरीश साटेलकर; आणि जीटीबी बोर्ड सदस्य श्री मार्क मेंडिस यांचा सहभाग होता.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, की हा पुरस्कार गोव्याला सर्व प्रकारच्या प्रवाशांना भेट देण्यास वर्षभर पसंतीचे ठिकाण म्हणून अद्वितीय अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या अढळ वचनबद्धतेचा पुरावा आहे.

गोव्याला मिळालेला पुरस्कार हा राज्याला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून स्थान देण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो. गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, वेलनेसचा अनुभव आणि साहसी पर्यटनाच्या संधींचे प्रदर्शन करून, आम्ही रशियासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आमची ओळख वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवतो. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT