Chapora Fort Goa tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

Goa Tourism Chapora Fort : शापोरा किल्ल्यावर आकाश, समीर आणि सिड हे तिघे मित्र भविष्याबद्दल, आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारताना दाखवले आहेत

Akshata Chhatre

Akshaye Khanna movie locations Goa: काही चित्रपट केवळ रिलीज होऊन जातात, पण काही चित्रपट 'क्लासिक' म्हणून नाव नोंदवून जातात. फरहान अख्तर दिग्दर्शित २००१ मध्ये आलेला 'दिल चाहता है' हा असाच एक महत्त्वाचा चित्रपट. या चित्रपटाने भारतीय सिनेमाला आधुनिक मैत्री, नातेसंबंधांची नवी परिभाषा सांगितली आणि गोव्यातील शापोरा किल्ल्याला नव्याने ओळख दिली. चित्रपटात आमिर खान (आकाश), सैफ अली खान (समीर) आणि अक्षय खन्ना (सिड) या तीन मित्रांची कथा सांगितलीये.

अक्षय खन्नाचा 'सिड' आणि 'शापोर्रा फोर्ट' कनेक्शन

सध्या धुरंधरमुळे गाजणाऱ्या अक्षय खन्नाची या चित्रपटातील 'सिड' ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सिडची शांत, संयमी आणि विचारशील भूमिका तेव्हा तरुणांना खूप भावली होती. तुम्हाला माहितीये का? आत्तापर्यंत अक्षय खन्नाने गोव्यात चित्रीकरण केलेला हा एकमेव चित्रपट आहे. याच शापोरा किल्ल्यावर आकाश, समीर आणि सिड हे तिघे मित्र भविष्याबद्दल, आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारताना दाखवले आहेत.a

२३ वर्षांनंतरही 'दिल चाहता है फोर्ट'ची क्रेझ

चित्रपट रिलीज होऊन २३ वर्षे उलटली असली तरी, गोव्यातील शापोरा किल्ल्याची ओळख आजही 'दिल चाहता है फोर्ट' अशीच आहे. उत्तर गोव्यातील हा किल्ला इतिहास आणि सुंदर दृश्यांचे संयोजन देतो. अरबी समुद्राच्या वर उंच वसलेला हा किल्ला गोव्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.

किल्ले पाहण्यासाठी येणारे पर्यटक केवळ इतिहासासाठी नव्हे, तर अक्षय खन्ना आणि त्याच्या मित्रांच्या त्या प्रसिद्ध दृश्याची आठवण ताजी करण्यासाठी येथे आवर्जून येतात. शापोरा किल्ल्याच्या खाली पार्किंगची चांगली सोय आहे. तसेच, गोव्यातील हस्तकला आणि स्नॅक्स विकणारे विक्रेतेही येथे दिसतात. इतिहास जाणून घेण्यासाठी असो, किंवा अक्षय खन्नाच्या 'सिड'ची भूमिका पुन्हा जगण्यासाठी, शापोरा फोर्ट एक अविस्मरणीय अनुभव देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT