Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांची गोव्याकडे पाठ !उच्च दर्जाच्या पर्यटनासाठी सुविधांची गरज

Goa Tourism: पर्यटन उद्योगातील घटकांचे मत, पर्यटक अन्यत्र वळल्याचा धसका

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism: उच्च दर्जाच्या पर्यटकांनी गोव्याकडे पाठव फिरवली असून व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, मालदीव सारख्या पर्यटनस्थळांकडे वळले आहेत.

याचा धसका राज्यातील पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी घेतल्याने उच्च दर्जाच्या पर्यटनासाठी साधन सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत घटकांनी व्यक्त केले आहे.

कुटुंबाभिमुख पर्यटन स्थळ गोवा व्हावे, या दृष्टीकोनातून निर्णय सरकारने घेतले पाहिजे. मुख्य म्हणजे साधन सुविधा निर्माण झाल्यास याचा फायदा स्थानिक लोकांना देखील होणार, कारण नोकऱ्या मिळणार आणि सुविधांचा लाभ त्यांना घेतला येईल.

पर्यटन केंद्रित प्रकल्पांना राज्यात विरोध झाला असून सरकारने मरिना आणि गोल्फ कोर्स सारख्या प्रकल्पासंदर्भात लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे घटकांचे म्हणणे आहे.

व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, मालदीव या पर्यटनस्थळांची थेट गोव्यासबोत स्पर्धा असून येथील साधन सुविधा गोव्यात ही होणे आवश्यक आहे, कारण त्या नसल्याने उच्च दर्जाचे पर्यटक येण्याची शक्यता कमी होते.

व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, मालदीव देशांमध्ये मरिना सारखा प्रकल्प असल्याने त्यांना याचा लाभ होतो. त्याशिवाय वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.

गोव्यात अजूनही अॅप आधारित सेवेचे अभाव कायम आहे. पर्यटकांना याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील केल्याचा जात आहे. त्यात टॅक्सी, रेंट – ए – कार, रेंट – ए – बाईक यांच्यावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT