गोवा सरकारने(Goa Government) पर्यटन(Tourism) व्यापारासाठी नवीन फी व परवाना ठरवण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही.त्यामुळे गोयातील पर्यटन व्यापाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. या वर्षीच्या सुरवातीलाच सरकारने अगोदर दिलेली व्यापारातील फी वाढ लागू करण्यात आली मात्र काही व्यापाऱ्यांनी अशी विनंती केली आहे की कोरोना सारख्या महामारीमुळे देशभरातील व्यसाय सध्या डबघाईला आले आहेत त्यामुळे सरकारने जी दरवाढ आहे ती तूर्तास करू नये.
तसेच यावर बोलताना एक वरिष्ठ पर्यटन अधिकारी म्हणाले की, "उद्योजकांच्या विनंतीवर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यातील बहुतेकांनी वाढीव फी भरली नसल्याचे आढळल्यास मंत्रालय त्यांना काही महिन्यांसाठी दिलासा देऊ शकेल.तसेच तारांकित हॉटेलसाठी, त्यांच्या महसुलाच्या दृष्टीने, वाढलेली फी थोडीशी असावी. वाढीव फी शासन कायम ठेवावे की नाही हे आम्ही अद्याप ठरवलेले नाही. नव्या ट्रेडिंग रचनेनुसार किती व्यापार्यांनी फी भरली आहे हे आम्हाला तपासून पाहावे लागेल.त्यांनंतरच प्रशासन योग्य निर्णय घेईल ".
गोव्यात काही महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेले नवीन नियम केवळ ऑनलाईन पर्यटकांच्या नोंदणीची करणे तर अनिवार्य आहे तसेच पर्यटन व्यवसायासाठी नोंदणी आणि परवाना शुल्कही अनेक पटींनी वाढविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नियमांच्या मसुद्याचे नियम लागू करण्यात आले होते तेव्हादेखील पर्यटन व्यवसायाने नाराजी व्यक्त केली होती.
गोवा (ट्रायल अॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा) च्या व्यापार मंडळाने सरकारला नवीन दरांची अंमलबजावणी काही महिन्यांपर्यंत किंवा परिस्थिती सुधारण्यापर्यंत स्थगित करण्याची विनंती केली होती मात्र सरकारकडून याबात आणखीनही स्पष्टता देण्यात अली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.