Bahrain Goa tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

Goa tourism Bahrain roadshow: आखाती देशांमधील पर्यटन बाजारात सहभाग वाढवण्यासाठी गोवा पर्यटन विभाग येत्या २३ नोव्हेंबर रोजी बहरीनमध्ये रोड शो आयोजित

Akshata Chhatre

Goa tourism campaign Gulf: गोव्यातील पर्यटन वाढवण्यासाठी आणि आखाती देशांमधील पर्यटन बाजारात सहभाग वाढवण्यासाठी गोवा पर्यटन विभाग येत्या २३ नोव्हेंबर रोजी बहरीनमध्ये रोड शो आयोजित करणार आहे, अशी माहिती असल्याची माहिती समोर आली आहे.

'वर्षभर पर्यटनाला' प्रोत्साहन

एका हिंदी वृत्तवाहिनीने सादर केलेल्या माहितीनुसार या उपक्रमाचा उद्देश व्यापार भागीदारी मजबूत करणे, वर्षभर पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि बहरीनच्या ट्रॅव्हल उद्योगाला गोव्याच्या विकसित होत असलेल्या पर्यटन परिदृश्याची ओळख करून देणे आहे.

"या रोड शोद्वारे, आम्ही गोव्याची संस्कृतीत रुजलेली, परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समकालीन असलेली 'सुधारित आवृत्ती' सादर करण्याचा उद्देश ठेवला आहे," असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले. सरकार गोव्याला जागतिक स्तरावरील ठिकाण म्हणून विकसित करत असून, ते पर्यटकांची गरज पूर्ण करेल. यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.

'Feels Like Goa' आणि तीन नवीन ग्लोबल ट्रेंड्स

राज्य पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, बहरीनमधील सहभाग गोव्याची आखाती प्रदेशातील दृश्यमानता वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. "या प्रदेशातील पर्यटक गुणवत्ता, विविधता आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देतात, हे सर्व मूल्ये गोवा अभिमानाने ऑफर करतो," असे ते म्हणाले.

रोड शोमध्ये गोव्याची 'Feels Like Goa' ही मोहीम अधोरेखित केली जाईल. ही मोहीम गोव्याला विविध अनुभवांनी समृद्ध असलेले ठिकाण म्हणून सादर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पर्यटन विभागाने तीन नवीन जागतिक प्रवास ट्रेंड्स गोव्याच्या पर्यटन धोरणात समाविष्ट केले आहेत, जे रोड शोमध्ये सादर केले जातील:

नॉक्टो टुरिझम: रात्रीच्या मनोरंजनाच्या ऑफरिंग्ज, मनोरंजन केंद्रे आणि थेट सांस्कृतिक अनुभवांना यातून प्रोत्साहन मिळेल.

जेट-सेटिंग: या ट्रेंडमध्ये गोव्याच्या वाढत्या सिनेमॅटिक फुट्सप्रिंटवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे गोव्याला चित्रपट-प्रेरित पर्यटनाचे केंद्र म्हणून स्थान मिळेल.

कामकेश: या अंतर्गत वेलनेस रिट्रीट्स, योगा आणि आयुर्वेद अनुभव तसेच शांत हिंटरलँड गेटवेजवर लक्ष केंद्रित केले जाईल, जे विश्रामदायी प्रवासासाठी डिझाइन केलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT