Goa Beach Shacks Canva
गोवा

Goa Tourism: पर्यटकांची संख्या कमी! शॅकमालकांनी मांडली व्यथा, हंगाम संपण्यापूर्वीच अनेकांनी गुंडाळला गाशा

Goa Beach Shack: मे महिन्यात पर्यटन हंगाम संपतो, परंतु व्यवसाय नसल्याने काही शॅक मालकांनी आपले शॅक मार्च महिन्यातच बंद करण्याचे निर्णय घेतले.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात पर्यटन हंगाम संपत आला असून अनेक शॅक मालकांनी व्यवसायात घट झाल्याने आपले शॅक बंद करण्यास सुरुवात केली आहे. यंदा अपेक्षित पर्यटक संख्या न मिळाल्याने शॅक व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मे महिन्यात पर्यटन हंगाम संपतो, परंतु व्यवसाय नसल्याने काही शॅक मालकांनी आपले शॅक मार्च महिन्यातच बंद करण्याचे निर्णय घेतले.

शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज म्हणाले, सध्या काही शॅक मालकांनी कमी व्यवसाय मिळाल्याने आपले शॅक बंद केले आहेत. मात्र, अद्याप काही शॅक सुरू आहेत. यावर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनीही यास दुजोरा दिला. ते म्हणाले, दरवर्षी मार्चमध्ये राज्यात येणाऱ्या पर्यटक संख्येत यंदा घट झाली आहे. मात्र, एकंदरीत पर्यटक अजूनही गोव्यात येत आहेत.

23 बेकायदेशीर शॅक्स बंद करण्याचे आदेश

राज्य सरकारने शॅक धोरण २०२३-२६ च्या अंमलबजावणीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३ शॅकमालकांना व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

बेकायदेशीर पद्धतीने शॅक भाड्याने देण्याच्या तक्रारींची पर्यटन विभागाने गंभीर दखल घेत किनाऱ्यांवरील शॅकची तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत आढळून आलेल्या गैरप्रकारांच्या आधारे ११० शॅकचालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yoga 2026: सूर्य, मंगळ आणि बुधाचा 'त्रैग्रही योग'; 'या' 5 राशींना मिळणार अमाप संपत्ती आणि प्रगतीची सुवर्णसंधी!

'मोसाद'शी संबंधित हेराला इराणमध्ये फाशी, हिंसाचाराचा ठेवला ठपका; जागतिक स्तरावर संतापाची लाट, पण तेहरान ठाम!

विमान उडाले, पण मुले खालीच राहिली! विसरभोळेपणाचा कळस आणि मातेचा टाहो; तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा तर देत नाही ना?

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

SCROLL FOR NEXT