Goa Beach Shacks: बेकायदा शॅक्सविरुद्ध कारवाईचा बडगा! 99 जणांना कारणे दाखवा नोटीस; पर्यटन खात्याची धडक मोहिम

Goa Beach Shack Owners Action: गोव्याची ओळख बनलेले शॅक चालविणारे व्यावसायिक आता पर्यटन खात्याच्या स्कॅनरखाली आले आहेत.
Goa tourism regulation
Goa Beach Shack PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach Shack Policy Violation Action

पणजी: गोव्याची ओळख बनलेले शॅक चालविणारे व्यावसायिक आता पर्यटन खात्याच्या स्कॅनरखाली आले आहेत. शॅक पोटभाड्याने देण्यासह इतर बेकायदा गोष्टी उजेडात आणण्यासाठी पर्यटन खात्याने आकस्मिक पाहणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राज्यातील ९९ जणांना कारणे दाखवा नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत.

पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शॅक्स व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शॅकमालकांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावणीदरम्यान त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यांना आतापर्यंत कोणताही दंड आकारण्यात आलेला नाही. मात्र, सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तपशिलामध्ये बिगर गोमंतकीय लोकांसाठी भाड्याने दिलेल्या शॅकची संख्या आणि त्यात गुंतलेल्या व्यवसायांची पुष्टी करणे अद्याप बाकी आहे.

यासंदर्भात नियमित तपासणी सुरू राहील आणि भविष्यात आढळलेल्या कोणत्याही उल्लंघनावर कारवाई केली जाईल, यावर अधिकाऱ्यांनी जोर दिला. अशा उल्लंघनांचा मागोवा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणांसंदर्भात, खात्याने असे ठरविले आहे, की नियम पालनाचे निरीक्षण करण्यासाठी नियामक तपासणी केली जाणार आहे. सध्या, उत्तर गोव्यातील शॅक वाटपासाठी प्रतीक्षा यादीतील अर्जांच्या संख्येबाबत माहिती संकलित केली जात आहे.

गोवा शॅक धोरणाचे उल्लंघन

शॅक परवाने हे केवळ गोमंतकीयांनाच दिले जात असताना शॅक चालविण्यासाठी ते पोटभाड्याने दिले जात असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्यटन खात्याने राज्यातील विविध ठिकाणी बीच शॅकच्या कामकाजाची अचानक तपासणी केली. या तपासणीत गोवा शॅक धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले असून, त्यात शॅक भाड्याने देण्याच्या प्रकारांचाही समावेश आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Goa tourism regulation
Goa Beach Shack: उत्तर गोव्यात स्थानिकांचे 109 शॅक पोटभाड्याने, पर्यटन खात्याच्या पाहणीत धक्कादायक माहिती समोर

बैठक ठरवा, माझे सहकार्य; खंवटे

मंत्री खंवटे यांनी लोबो यांच्‍या मुद्यांवर भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. ते म्‍हणाले, लोबो यांना विदेशी पर्यटकांची वास्तविक आकडेवारी दाखविली जाईल. कळंगुट येथील काही विषय सोडविण्‍यात येत आहेत. मागील वर्षांपेक्षा यावेळी पर्यटक संख्या निश्चित राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. कळंगुटमधील पर्यटक कमी का झाले याविषयी स्थानिक, व्यावसायिक, पंचायत मंडळ, आमदार यांच्यासह बैठक अपेक्षित आहे. त्यांनी ती ठरवावी, आम्ही तयार आहोत. शॅक व्‍यावसायिकांची बेकायदा कोणतीही कृती खपवून घेतली जात नाही. शॅक धोरणात गोमंतकीयांचेच हित जपले आहे.

Goa tourism regulation
Goa Beach Shacks: 'सर्व शॅक्सना 11 नंतर खुलं राहण्याची परवानगी द्या; काहीजणांमुळे सर्वांवर अन्याय नको!' कळंगुटच्या आमदारांची विनवणी

उत्तरेत ८०, दक्षिणेत १९ जणांना दणका

या तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना केवळ उत्तर गोव्यात एकूण ८० नियमोल्लंघनाची प्रकरणे दिसून आली, ज्यात शॅक भाड्याने देणाऱ्यांचाही समावेश आहे.

गोवा शॅक धोरणांतर्गत या शॅक्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दक्षिण गोव्यात १९ शॅक्स मालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

शॅक्समध्ये होत असलेली बेकायदेशीरता सत्यापित करण्यासाठी आणि धोरणाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही तपासणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com