Tourist parking issues in Goa
Goa Tourist ProblemsDainik Gomantak

Goa Tourism: गोव्यातील धार्मिक स्थळांवर वाहनांची गर्दी! पार्किंग समस्येने पर्यटक त्रस्त; वाहतूक कोंडीमुळे वाढता मनस्ताप

Tourist parking issues in Goa: गोवा हे पर्यटनासाठी महत्त्वाचे राज्य ठरले आहे. एकवेळ गोवा म्हणजे समुद्र किनारे असा काहीसा समज पर्यटकांचा झाला होता.
Published on

Parking problem at Goa temples

मडकई: गोवा हे पर्यटनासाठी महत्त्वाचे राज्य ठरले आहे. एकवेळ गोवा म्हणजे समुद्र किनारे असा काहीसा समज पर्यटकांचा झाला होता, पण गोव्याच्या सुंदर निसर्गाचा आणि येथील सुबक सुंदर प्रसिद्ध देवालयांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील पर्यटन बहरत चालले आहे. मात्र, अशा देवालयांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी योग्य जागा नसल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मंगेशी येथील प्रसिद्ध श्री मंगेश देवस्थानला तर हजारो पर्यटक रोजच भेट देतात. या ठिकाणी पर्यटकांसाठी पार्किंगची चांगली सोय करण्यात आली आहे, तरीही वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे या वाहनांचाच श्‍वास कोंडतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

म्हार्दोळ येथील महालसा देवीसह बांदोड्यातील नागेश, महालक्ष्मी, रामनाथी येथील रामनाथ तसेच फोंडा तालुक्यातील इतर अनेक ठिकाणच्या देवालयांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अपुरे पडत आहेत, परिणामी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

Tourist parking issues in Goa
Goa Tourism: 'किनारी भागात अशांतता वाढलीय, मूळ गोव्याचे सौंदर्य कुठेतरी हरवतंय', पर्यटकाने शेअर केलेला अनुभव वाचा

बाणावलीत पार्किंग जागेत उपद्रवी युवकांचा धिंगांणा

बाणावली येथील पार्किंग जागा आता उपद्रवी युवकांचा अड्डा बनला आहे. रात्री अपरात्री या जागेत येऊन काहीजण धांगडधिंगांणा घालत असतात. कोलवा पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या भागातील लोकांकडून होत आहे. नशेत असताना या लोकांचे एकमेकांमध्ये हाताघाईच्या घटनाही घडतात. एखाद्यावेळी खूनही होऊ शकतो, वेळीच पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Tourist parking issues in Goa
Goa Tourism: गोव्यात कार किंवा स्कूटी भाड्यानं घ्यायची? मग 'या' टिप्स वाचाच नाहीतर फसाल

कुठ्ठाळीवरील एकेरी वाहतूक बंद

कुठ्ठाळी - पांजेतार ते कुठ्ठाळी - खुरसाकडेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाची एकेरी वाहतूक काही किरकोळ कामांसाठी बंद करण्यात आली आहे. मडगावहून येणाऱ्या वाहनांना पांजेतार येथून खुरसापर्यंतचा पल्ला एकेरी मार्गाने पार करावा लागतो, तर समोरून येणाऱ्या मडगावकडे जाणाऱ्या वाहनांशी गाठ पडते. दरम्यान, या ठिकाणी बस थांब्यावर प्रवासी थांबलेले असतात, तसेच रस्ता ओलांडणाऱ्या स्थानिकांसाठी हा बदल सध्या जिकीरीचा ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com