Goa panchayat tourism protest Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Mhadei river rafting news: सरकारने प्रलंबित निधी लवकरात लवकर दिला नाही, तर रिव्हर राफ्टींग बंद करू

Akshata Chhatre

कुडचडे: पर्यटन खात्यामार्फत सत्तरी तालुक्यात म्हादई नदीवर गेल्या नऊ वर्षांपासून रिव्हर राफ्टींग सेवा सुरू आहे. मात्र, यासाठी फक्त पहिल्याच हंगामात सरकारकडून करारानुसार सावर्डे पंचायतीला ५० हजारांचा निधी प्राप्त झाला. गेल्या आठ हंगामांत त्यांना एकही रुपयाचा निधी प्राप्त झालेला नाही. आता याबाबत सावडे पंचायत मंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जर सरकारने प्रलंबित निधी लवकरात लवकर दिला नाही, तर रिव्हर राफ्टींग बंद करू, असा इशारा सावडे पंचायत मंडळाने दिला आहे.

या पर्यटन सेवेच्या प्रारंभी सरकारने सावर्डे व नगरगाव पंचायतीसोबत सामंजस्य करार केला होता, या करारानुसार प्रत्येक हंगामाला दोन्ही पंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा निधी देण्याचे ठरले होते. या दोन्ही पंचायतींचा महसूल हा अगदी तुटपुंज्या स्वरूपात असल्याने या निधीचा त्यांना विकासकामांसाठी मोठा उपयोग होणार होता.

शुक्रवारी (दि.१५) झालेल्या ग्रामसभेनंतर उपसरपंच शिवाजी देसाई यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे झालो म्हादई नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा निधी सावर्डे पंचायतीला मिळालेला नाही, आम्ही हा निधी मिळण्याबावत संबंधित सरकारी यंत्रणेला पत्र लिहूनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता आम्ही असा निर्णय घेतला आहे, की जर सरकारने करारानुसार सात-आठ वर्षांचा निधी तात्काळ दिला नाही तर रिव्हर राफ्टीग बंद पाडू.

सावर्डेतील विकासकामांना खीळ

सावर्डे पंचायत ही आर्थिकदृष्ट्या अतिशय गरीब पंचायत आहे. त्यामुळे या रिव्हर राफ्टींगच्या निधीचा पंचायतीला काही विकासकामे मार्गी लावण्यासाठी उपयोग होणार होता. मात्र गेली अनेक वर्षे सरकारकडून हा निधी न मिळाल्याने त्याचा पंचायतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित हा निधी द्यावा अशी मागणी गावकर यांनी केली आहे

सापत्नभावाची वागणूक

सरकार एका बाजूला राज्यात हिटरलेण्ड पर्यटन वाढीच्या गोष्टी सांगत आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज संस्थांना सापत्नभावाची वागणूक देत आहे अशाने सरकारच्या प्रयत्नांना यश मिळेल का, असा सवाल ग्रामसभेला उपस्थित माजी सरपंच नारायण गावकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT