Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Goa traffic rules minors: शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढलेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी मडगाव पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
loud silencer penalty Goa
loud silencer penalty GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढलेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी मडगाव पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, दोन प्रमुख वाहतूक नियमांच्या उल्लंघनांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे, यांपैकी एक म्हणजे अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालवणे आणि दुसरे म्हणजे मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणे. या कारवाईला नागरिकांकडून वाढलेल्या तक्रारी कारणीभूत आहेत.

पालकांनाही कारवाईचा इशारा

पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अल्पवयीन मुले वैध परवान्याशिवाय दुचाकी चालवताना आढळली असून, त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, बेकायदेशीरपणे सायलेंसर बदलून वाहनांचा आवाज वाढवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. अनेकवेळा चेतावणी देऊनही या नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने कठोर पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

loud silencer penalty Goa
Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

सामंत यांनी पालकांनाही एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या अपघाताच्या परिस्थितीत, पालकांनी परवानगी दिल्यामुळेच मुलांनी गाडी चालवली हे सिद्ध झाल्यास त्याची जबाबदारी पालकांवरच येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

१०,००० रुपयांचा दंड आणि कडक कारवाई

सध्याच्या नियमांनुसार, मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरल्यास १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. न्यायालये यावर अतिरिक्त दंडही लावू शकतात. मडगावमधील रस्त्यांवर सुरक्षितता राखण्यासाठी आणि रहिवासी भागातील शांतता भंग होऊ नये म्हणून ही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com