Rohan Khaunte on Ranveer Allahbadia Dainik Gomantak
गोवा

Ranveer Allahbadia: 'ही तर समाजाला लागलेली कीड'; गोव्यातील भाजप मंत्र्याने रणवीरला सुनावलं

Ranveer Allahbadia Controversy: बिअर बायसेप गाय म्हणजेच रणवीर अल्लाहबादियाने केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जातोय

Akshata Chhatre

पणजी: गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन समय रैनाचा युट्युबवर सुरु असलेला शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही युट्युबवरील इन्फ्लुएन्सर्सनी केलेल्या अश्लील शेअरबाजीमुळे अल्पवधीत प्रसिद्धीस आलेल्या इंडियाज् गॉट लॅटेंट नावाचा शो बंद करण्याची मागणी केली जात आहे.

यात 'beerbicep' शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या रणवीर अल्लाहबादियाने केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी देखील एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

पर्यटनमंत्री रोहन खवंटे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतायत की, रणवीरसारख्या लोकांनी केलेल्या टिप्पण्या समाजाच्या जडणघडणीसाठी घातक आहेत, समाजाला लागलेली कीड आहे. अशा प्रकारच्या विकृत टिप्पण्या करून ही लोकं क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली संपूर्ण पिढीच्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास करत आहेत.

बिअर बायसेप गाय म्हणजेच रणवीर अल्लाहबादिया हा तरुण पिढीमध्ये त्याच्या युट्युब कॉन्टेन्टमुळे प्रसिद्ध झाला. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जाणकारांसोबत त्याने केलेल्या चर्चा सर्वांना भावत होत्या आणि परिणामी रणवीर प्रसिद्धीच्या झोतात आला, मात्र आता त्याने केलेल्या टिप्पणीमुळे रणवीर समोर अडचणी वाढल्या आहेत. घडलेल्या प्रकारानंतर चाहत्यांनी व्यक्त केलेला रोष पाहून युट्युबर रणवीर याने सर्वांची माफी मागितली होती.

मूळ प्रकरण काय?

समय रैना नावाच्या युट्युबरच्या चॅनेलवर इंडियाज् गॉट लॅटेंट नावाचा शो सुरु आहे. या शोमध्ये रणवीर अल्लाहबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना यांनी काही अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. यावरुन सध्या एक्सवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करा आहेत आणि संपूर्ण कार्यक्रमच अश्लील शेरेबाजीवर आधारित असून, या कार्यक्रमावर बंद घातली जावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT