Goa Shacks  Dainik Gomantak
गोवा

Shack License Renewal: शॅक उभारण्यासाठी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

Goa Shack License Renewal: संभाव्य शॅक अर्जदार/ सामान्य यांनी माहितीसाठी पर्यटन विभागाच्या संकेतस्थळास भेट देता येईल.

Pramod Yadav

तात्पुरत्या हंगामी संरचना असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील शॅक उभारण्यासाठी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया पर्यटन विभागाने सुरु केलीय.

2024-2025 या वर्षासाठी समुद्रकिनाऱ्यावरील डेक बेड /छत्र्या/ झोपड्या आणि इतर संरचना 19 जुलै 2024 पासून निश्चित करण्यात आल्या आहेत.

शॅक पॉलिसीच्या अटी व शर्तींचे पालन करणाऱ्या शॅक धारकांना गोवा इलेक्र्टॉनिक्स लिमिटेड GEL (Goa Electronics Limited) द्वारे या प्रक्रियेबद्दल सूचित केले जाईल.

त्यानंतर, अर्जदाराने, पर्यटन विभागाने 2023-2024 पर्यटन हंगामासाठी जारी केलेली अंतिम ना हरकत प्रमाणपत्रासह, आरएफ़सी, जीईएल (RFC, GEL) पर्यटन भवन, पट्टो पणजी आणि आरएफ़सी, जीईएल (RFC, GEL) मथनी सलधाना कॉम्प्लेक्स मडगाव येथे आवश्यक डिमांड ड्राफ्टसह सादर करणे आवश्यक आहे.

पर्यटन हंगाम 2023-26 साठी तात्पुरत्या हंगामी संरचना, समुद्रकिनाऱ्यावरील शॅक/ डेक बेड/ छत्र्या/ झोपड्या आणि इतर संरचना उभारण्यासाठी अटी व शर्ती नियंत्रित करणारे पर्यटन धोरण 2023-2026 सह अर्ज, पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले आहेत.

संभाव्य शॅक अर्जदार/ सामान्य यांनी माहितीसाठी पर्यटन विभागाच्या (goatourism.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT