India Pakistan tension tourism impact Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: मोकळे किनारे, हॉटेल बुकिंग्ज रद्द! भारत-पाक संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनाला फटका

India Pakistan Tension: सुखिजा यांनी सांगितले की, देशातील सध्याच्या अस्थिर स्थितीमुळे हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आली आहेत.

Sameer Panditrao

पणजी: भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. राज्यातील हॉटेल व्यवसायावर याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत असून, आधी सुमारे ५५ टक्के ओक्युपंसी असलेली हॉटेल बुकिंग आता ३५ टक्क्यांवर आली आहे.

यामुळे सुमारे २० टक्के नुकसान हॉटेल व्यावसायिकांना सहन करावे लागत आहे,अशी माहिती गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी दिली.

Surla Village Goa

सुखिजा यांनी सांगितले की, देशातील सध्याच्या अस्थिर स्थितीमुळे हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आली आहेत. किनारी भागातील हॉटेल व्यावसायिकांना याचा अधिक फटका बसला आहे. अनेक पर्यटकांनी बुकिंग केल्यानंतर ते रद्द केले, ज्यामुळे पर्यटन व्यवसायात मोठे नुकसान झाले.

सुखिजा म्हणाले की, सध्याची परिस्थिती ही संघर्षकाळातील अपेक्षित परिस्थिती आहे. आम्ही लवकरच यातून सावरू आणि पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्र उभारी घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT