Goa Tourism | Goa Tourism Places | Goa Tourism News Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: हे करा, हे करू नका! गोव्यात आता लवकरच पर्यटकांसाठी नियमावली

पर्यटकांना गोव्यात काय करायचे काय करू नये याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.

Pramod Yadav

Goa Tourism: गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. यासह ऑनलाईन फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, फसवे एजन्ट आणि दलाल देखील सक्रिय झाले आहेत. याचसाठी खबरदारी म्हणून गोवा पर्यटन खाते गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी नियमांवली जाहीर करणार आहे. यामुळे पर्यटकांना गोव्यात काय करायचे काय करू नये याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार पर्यटकांना गोव्यात हॉलिडे प्लानिंग (Goa Holiday Planning) करता येईल.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पर्यटन मंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषत: गोव्यात सक्रिय असलेले फसवे दलाल आणि ऑनलाईन पद्धतीने होणारे फेक हॉटेल बुकिंग याबद्दल चर्चा करण्यात आली. फेक बुकिंग घेऊन पर्यटकांची फसवणूक केल्याची घटना कळंगुट आणि बागा (Calangute And Baga Beach) परिसरात घडली होती. तसेच, एस्कॉर्ट सेवा पुरवतो असे सांगून आंध्रप्रदेश येथील महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात पणजी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली या महिलेला 40 हजार रूपयांना गंडा घातला आहे.

पर्यटनक्षेत्र असल्याने गोव्याला मौजमजा करण्यासाठी भेट देणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. विशेषत: पुरूषांची संख्या अधिक असल्याने अशाच लोकांना विविध ऑनलाईन सेवेच्या नावाखाली फसवले जाते. फसवणूक झाल्यानंतर हे लोक तक्रार देखील करत नाहीत. यामुळे गोव्याची प्रतिमा मलिन होते असे येथील स्थानिक सांगतात. पर्यटन विभागाकडून नियमावली जारी केल्यानंतर त्याचा पर्यटकांना फायदा होईल. असेही नागरिकांनी म्हटले आहे. ही नियमावली पर्यटन विभागाचे संकेतस्थळ आणि सोशल मिडियावर देखील शेअर केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT