Old Goa: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीची नासधूस, ग्रामस्थांमध्ये तणाव

घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak

खुरसावाडो-दिवाडी (Khursawado-Divar) येथे अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या तलवारीची नासधूस करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.16) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावरून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Cuncolim gas leakage : कुंकळ्ळी एमआयडीसीमध्ये विषारी अमोनिया वायुची गळती, परिसरात भीतीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, खुरसावाडो-दिवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दररोज आरती लावली जाते. शुक्रवारी रात्री आठ वाजता एक व्यक्ती आरती लावण्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीची नासधूस झाल्याचे सांगितले. यावरून परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर गावकऱ्यांनी ओल्ड गोवा (Old Goa) पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी देखील याप्रकरणी दखल घेतली असून, घटनास्थळी जाऊन पुतळ्याची पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Margao Railway : धावत्या ट्रेनमधून उतरताना पाय सटकला अन् जीवास मुकला

काही दिवसांपूर्वी साखळीत देखील एका परप्रांतीय मुस्लिम तरूणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा फडकावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मुस्लिम समाजाची धार्मिक फेरी जात असताना हा प्रकार घडला होता. ग्रामस्थांनी आणि शिवप्रेमींनी या माथेफिरू तरूणाला गाठून महाराजाच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागायला भाग पाडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com