Goan News Dainik Gomantak
गोवा

Goan News: तोतया पर्यटक गाईडकडून फसवणूक; पर्यटन खात्याची चालढकल!

Goan News: जेटीवर जल विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना फसवण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Goan News: तोतया पर्यटक गाईडची संख्या वाढली असून जेटीवर जल विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना फसवण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलिस व्यवस्था होती, तिही आता गायब झाली आहे. यावर उपाय म्हणून सर्व गाईडना पर्यटन खात्याकडे नोंदणी सक्तीचा करणे आवश्‍यक असून पर्यटन खाते पोलिसांवर तर पोलिस पर्यटन खात्यावर चालढकल करीत आहे.

पणजी शहरात एखादी परप्रांतीय कार अथवा वाहन दिसताच तिचा पुलावरून पाठलाग सुरू होतो. स्वस्त दरात कॅसिनोत पाठवण्याचे व बोटिंगचे आमिष दाखवले जाते भरमसाठ किंमती आकारल्या जातात. काही पर्यटक त्याला बळीही पडतात.

फसवणूक झाल्यावर पोलिस तक्रार करण्यास धावतात, पण त्यांची कधीच तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. यावर पोलिस पर्यटन विभागाचे उपअधीक्षक शिवराम वांयगणकर यांना विचारले असता त्यांनी तोतया पर्यटक गाईडच्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे मान्य केले.

तसेच, त्यांच्यावर कारवाई स्थानिक पोलिसांनी करायला हवी, असे ते म्हणाले. यावर पणजी पोलिसांना विचारले असता रोज तोतया टुरिस्ट गाईडना ताब्यात घेतले जाते व त्यांना दंड देऊन सोडले जाते, असे पणजी पोलिसांनी सांगितले.

नव्या जेटीनंतर प्रश्‍न सुटेल!

पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांना यासंबंधी विचारले असता नवी जेटी बांधल्यानंतर प्रश्र्न सुटणार आहे. तिकीट खरेदीसाठी एक काउंटर जर पर्यटन खाते देऊ शकले, तर ही समस्या मिटेल.

मांडवी नदीतून फेरफटका मारण्यासाठी असलेल्या पर्यटन बोटींच्या मालकांपेक्षा या एजंटनाच कमिशन जास्त जाते जाते. या तोतया गाईडवर पर्यटन खात्याने नजर ठेवण्यापेक्षा पोलिसांनी कडक कारवाई करावी, पोलिस आणि पर्यटन खात्याचे अधिकारी एकत्र बेठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

SCROLL FOR NEXT