Goa Municipality
Goa MunicipalityDainik Gomantak

Goa Municipality: कंत्राटावरील चतुर्थश्रेणीतील 170 कामगार कायम होणार!

Goa Municipality: महापालिका इमारतीच्या शेजारी यू आकाराचा दक्षिणेकडील एक भाग हटविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Published on

Goa Municipality: महापालिकेत रस्ता काम व इतर मजुरीचे करणाऱ्या 170 कामगारांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार आता कायमस्वरूपी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. काही दिवसांतच त्यांना स्वीकृतीपत्र मिळणार असून, या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यकाळात सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर उदय मडकईकर यांच्या काळात सुमारे 75 कामगारांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार कायम करण्यात आले होते. त्यावेळी उर्वरित कामगारांना कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

Goa Municipality
Goa News: मत्स्य व्यापाऱ्यांना नोंदणी सक्तीची

आता महापालिकेने 170 जणांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना निम्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळतील. महापालिकेत चारशेच्या आसपास कंत्राटी पद्धतीवर कामगार आहेत.

त्यातील सेवाज्येष्ठता तपासून टप्प्याटप्प्याने कामगारांना कायमस्वरूपी करण्यात येत असल्याने आता उर्वरित कामगारांचाही पुढील काही काळात कायम केले जाण्याची शक्यता आहे. मागीलवेळी अनेकांना या सेवाज्येष्ठतेच्या अटीतून बाहेर पडावे लागले होते, परंतु आता त्यांचे नाव यादीत आल्याने एकप्रकारे ही दिवाळीची भेटच मिळाली आहे.

Goa Municipality
Goa Hospital: राज्य सरकारचे गोमेकॉला पत्र; देहदान प्रक्रियेतील महत्त्वाचा अडसर दूर!

इमारत पाडण्यास ग्रहणाची आडकाठी

महापालिका इमारतीच्या शेजारी यू आकाराचा दक्षिणेकडील एक भाग हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इमारतीवरील पत्रे हटविण्यात आले असून, आतील साहित्यही हटविण्यात येत आहे. इमारत बांधकामाचा भाग जेसीबीच्या साह्याने पाडण्याचे काम मंगळवारी सुरू करण्यात येणार होते. परंतु त्यास ग्रहण आडवे आले.

दोन दिवस ग्रहणाचा कालावधी असल्याने पुन्हा हे काम आणखी लांबणार आहे. महापालिकेतर्फे जे बांधकाम पाडावयाच्या आहे, त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. अकरा कोटीच्या कामाचा हा प्रकल्प असल्याने हे काम जेवढ्या जलद गतीने होईल, तेवढ्या लवकर महापालिकेला आपले कामकाज नव्या इमारतीत स्थलांतरित करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com