Tourism  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Department: पर्यटन खात्याचा महत्वाचा निर्णय! टुरिस्ट गाइडसाठी आता प्रमाणपत्र प्रशिक्षण अनिवार्य

Goa Tourism Department: बेकायदा कार्यरत असणाऱ्या टुरिस्ट गाइडचा सुळसुळाट किनारी भागांमध्ये असून, त्याचा अनेकदा पर्यटकांना त्रास होतो.

Ganeshprasad Gogate

Goa Tourism Department: पर्यटनासाठी देशासहित परदेशात लोकप्रिय ठिकाण म्हणून गोव्याकडे पहिले जाते. येणाऱ्या पर्यटकांचे यथोचित आदरातिथ्य करावे ते गोवेकरांनीच.

पर्यटकांना शांत, सुंदर समुद्रकिनाऱ्यांसहित इथल्या पर्यटन स्थळांचा आनंद लुटता यावा यासाठी स्थानिक आणि प्रशासन विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

याच संदर्भात पर्यटन खात्याने एक महत्वाचा निर्णय जारी केलाय. राज्यातील पर्यटन स्थळांवर टुरिस्ट गाइड म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना आता केंद्र व राज्य प्रमाणपत्र प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे पर्यटन खात्याने नमूद केल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर कार्यक्रम' या अंतर्गत - टुरिस्ट गाइड होण्यास इच्छुक असणाऱ्यांना हे प्रमाणपत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यासाठी https://iitf.gov.in/ इच्छुकांनी या संकेस्थळावर आपले नाव नोंद करावे. या उमेदवारांना केंद्र सरकारचे - 'इन्क्रेडिबल फॅसिलिटेटर इंडिया टुरिस्ट कार्यक्रम' अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल.

हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना गोवा पर्यटन खात्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. दोन्ही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच या उमेदवारांना गोव्यात टुरिस्ट गाइड म्हणून आपले नाव नोंद करता येईल, असेही पर्यटन खात्याने नमूद केले आहे.

राज्यात दरवर्षी लाखो संख्येने पर्यटक येतात. राज्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेकदा पर्यटक टुरिस्ट गाइडची मदत घेतात.

बेकायदा कार्यरत असणाऱ्या टुरिस्ट गाइडचा सुळसुळाट किनारी भागांमध्ये असून, त्याचा अनेकदा पर्यटकांना त्रास होतो.

त्यामुळेच आता टुरिस्ट गाइड होण्यास इच्छुक असणाऱ्यांना पर्यटन खात्याने केंद्र व राज्य प्रमाणपत्रीत प्रशिक्षण घेणे सक्तीचे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT