Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: गोव्यात स्थानिक टॅक्सी चालकांची दादागिरी सुरुच; मोपा विमानतळावर पर्यटकाला दिला त्रास Video Viral

Goa Tourism News: या व्हिडीओमध्ये पर्यटक स्थानिक रिक्षाचालकांच्या विरोधात आणि पर्यटकांना टॅक्सी माफिया कसे त्रास देतायत यावर पर्यटक बोलताना दिसतायत

Akshata Chhatre

मोपा: गोव्यातील पर्यटनावर सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. काही पर्यटक गोव्यातील व्हिडीओ शेअर करत गोवा हे पर्यटनासाठी कसं योग्य ठिकाण नाही यावर लक्ष केंद्रित करत आहेत. सध्या गोव्यातील मोपा विमानतळावरचा एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटक स्थानिक टॅक्सीचालकांच्या विरोधात आणि पर्यटकांना टॅक्सी माफिया कसे त्रास देतायत यावर पर्यटक बोलताना दिसतायत.

या व्हिडीओमध्ये पर्यटक गोव्यातील स्थानिक टॅक्सी चालकांना टॅक्सी माफिया म्हणतायत. व्हिडीओमधून मिळणाऱ्या माहितीनुसार मोपा विमानतळावरील टॅक्सी चालकांनी त्यांची रेंटल गाडीची चावी काढून घेतली तसेच त्यांच्यावर दादागिरी केली. त्यांच्या मते रेंटल गाडी बुक केल्यामुळे त्यांच्यासोबत दादागिरी करण्यात आली होती. गोव्यातील टॅक्सी चालकांनी त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली आणि ती चावी परत जाण्यास नकार दिला.

'इंटरनेशनल डेस्टिनेशन'च्या यादीत गोवा 'अव्वल'

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बुकिंग पोर्टल एक्सपेडियाने जारी केलेल्या एका अहवालानुसार वर्ष २०२४ मध्ये गोव्याच्या पर्यटकांमध्ये घट झाली होती मात्र आता इंटरनेशनल डेस्टीनेशन्समध्ये गोव्याने आपले स्थान बळकट केले आहे.

एक्सपेडियाच्या अहवालानुसार गोवा जानेवारी २०२५ पासून बराच चर्चेत आला आहे. गोव्यासाठी फ्लाइट बुकिंग करणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत तब्बल आता १५५ टाक्यांनी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

SCROLL FOR NEXT