Goa Tourism  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: सलग सुट्ट्यांमुळे गोवा 'फुलला'; पण गर्दी गतवर्षीपेक्षा निम्मीच...

Goa Tourism: सध्या गोव्यात शिगमोत्सवाला सुरुवात झालीय.

Ganeshprasad Gogate

Goa Tourism: आज गुड फ्रायडेची सुट्टी तसेच उद्या परवाचे वीक एन्ड यांमुळे गोव्यात पर्यटकांनी गर्दी केलीय. हरमल, मांद्रे, शिवोली, कळंगुट, बागा, मिरामार सारख्या किनारीभागात देशी-विदेशी पर्यटक जमले आहेत.

तसेच येथील शॅक, रेस्टोरंट, हॉटेल्स सुद्धा फुल्ल झाल्याची माहिती मिळतेय. सध्या गोव्यात शिगमोत्सवाला सुरुवात झालीय.

ही अनोखी पारंपरिक प्रथा आणि परंपरा पाहण्यासारखी असल्याने गोव्यालगतच्या राज्यातील पर्यटक देखील यानिमित्ताने राज्यात दाखल झाले आहेत.

मात्र ही गर्दी गतवर्षीपेक्षा अर्धीच आहे, असे मत येथील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. नियमित येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.

गोव्यातील कळंगुट आणि कांदोळी सारखे समुद्रकिनारे दिवसभरात पर्यटकांनी खचाखच भरले होते. तसेच शेजारील महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतून अनेक वाहने गोव्यात दाखल झाली आहेत व होत आहेत.

वाहतूक कोंडी काही सुटेना!

तसेच राज्यात काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने स्थानिक तसेत पर्यटकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. किनारी भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT