Dr Tejas Kamat diabetes claim Dainik Gomantak
गोवा

Goa Diabetes Ranking: मधुमेहात गोवा देशात अव्वल! डॉ. कामत यांचा दावा; तरुणांमध्ये वाढते प्रमाण चिंताजनक

Rising diabetes in youth: वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर युवा पिढीसाठी ती फार गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. तेजस कामत यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

थिवी: गोवा हे मधुमेहासाठी भारताची राजधानी बनली आहे. कारण आज गोव्यात मधुमेह रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या पाच दहा वर्षांत १८ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्येही हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर युवा पिढीसाठी ती फार गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. तेजस कामत यांनी केले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी बार्देश तालुका, थिवी ग्राम पंचायत व इंडियन मेडिकल अससोसिएशन बार्देश शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने थिवी पंचायत सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात कामत बोलत होते. यावेळी प्रा. सुभाष कौठणकर, शिवदास कांबळी, गीता शेळके, सलीम इसानी, डॉ. रचना हलर्णकर उपस्थित होते.

मधुमेहविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, आज प्रत्येकाने वयाची तिशी ओलांडल्यावर वर्षातून किमान एकदा आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहावे. आजच्या घडीला मधुमेहग्रस्त रुग्णांपेक्षा प्रि डायबेटीक व्यक्ती खूप आहेत.

त्यांनी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नित्य व्यायाम व संतुलित आहार घेतला, तर मधुमेह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. यासाठी प्रत्येकाने साखरेचे पदार्थ, गूळ, मध, मैदा, जास्त गोड फळे खाणे टाळावे असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Captaincy: 'मी तयार नव्हतो...' रोहित शर्माने मुलाखतीत सांगितली पडद्यामागची रंजक गोष्ट; काय म्हणाला नेमका?

Delimitation Bill 2026: अटी पूर्ण झाल्यास डिलिमिटेशन बिलाला साथ! ए. राजा यांनी स्पष्ट केली DMK ची भूमिका; चेन्नईतील बैठकीत मोठा निर्णय

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील हल्ला प्रकरणात आणखी 4 कैद्यांना अटक; आरोपींची संख्या सातवर

पॉवर, लूक आणि जबरदस्त फीचर्सचा भन्नाट मेळ! Royal Enfield Himalayan 750 बाजारात दाखल; 55 BHP पॉवर, 63 Nm टॉर्क आणि 5 रायडिंग मोड्सने वाढवली रायडर्सची उत्सुकता

Under 19 Cricket: गोव्याच्या गोलंदाजांचा ओडिशाला लगाम; पहिल्या डावातील आघाडीसाठी संघ सज्ज

SCROLL FOR NEXT