Sameer Panditrao
डायबेटिस होऊ नये असा विचार आपण करत असू तर सर्वांत आधी स्वतःचं निरीक्षण करावं लागेल. आपलं वजन, रक्तातील साखरेची पातळी, जीवनशैली यांचा विचार करावा लागेल.
ज्या लोकांच्या घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
आपला बीएमआय म्हणजे उंचीनुसार आदर्श वजन किती आहे हे सर्वांनी पाहिलं पाहिजे. जर वजन लठ्ठपणाकडे जात असेल तर काळजी घ्यावी लागेल.
भारतीय आहारात प्रथिनांनाही जागा दिली पाहिजे. भाज्या- फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. साखर आणि गोड पदार्थ, चॉकलेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने घरातील कामांच्या हालचालींशिवाय व्यायाम करण्याची गरज आहे असं डॉक्टर सांगतात. केवळ घरातल्या कामांवर विसंबून राहाता येणार नाही.
"साधारण वयाच्या पंचविशीपासून रक्तातील साखर, इन्शुलिन, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसिरॉइडचे प्रमाण तपासण्यासाठी चाचण्या केल्या पाहिजेत. त्यातून डायबेटिसचा अंदाज येऊ शकतो.
इंटरनेटवर माहिती वाचून परस्पर निर्णय घेऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे.