Goa Today's 19 July 2024 Marathi Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गोव्यातील ठळक बातम्या

Pramod Yadav

गोवा पोलिसांकडून बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, सात जणांना अटक

कळंगूटमधील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमधून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसणूक करून पैसे लुबाडण्याचे उद्योग सुरू होते.

मुसळधार पावसामुळे होंड्यात ठिकठिकाणी घरांची पडझड सुरूच

गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे होंडा भागात बऱ्याच घरांची पडझड झाली आहे, यामुळे नागरिकांना बराच फटका बसला असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

भुईपाल कॉलनी येथील निर्मला सखाराम शिंदे या महिलेच्या घराचा काही भाग गुरुवारी कोसळल्याने शिंदे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे, परंतु या घटनेची तात्काळ दखल घेत पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी हे घर तातडीने दुरुस्ती करण्याची जबाबदारी घेतली आमुसळधार पावसामुळे होंड्यात ठिकठिकाणी घरांची पडझड सुरूच आहे.

कांदोळीत मुंबईचे तिघे बुडाले; मॉर्निंग वॉक बेतला जिवावर

शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने गोव्यात रेड अलर्ट दिला होता. समुद्र किनारी फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने मुंबईतील दोन पर्यटकांचा कांदोळीत मृत्यू झाला.

मॉर्निग वॉकदरम्यान कांदोळीतील समुद्रकिनारी तीन जण बुडाले असून यातील दोन पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर एका पर्यटकाचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

Canacona News: काणकोणमधील भंगार अड्डयावरून स्थानिक आक्रमक

भंगार अड्डे ‌न हटविल्या विरोधात काणकोण पालिकेचे नगरसेवक धिरज नाईक गावकर मंगळवारी उपोषण करणार

Red Alert In Goa: गोव्यात दोन दिवस रेड अलर्ट, रविवारपासून तीन दिवस ऑरेंज अलर्ट

गोवा हवामान खात्याने आज आणि उद्या (१९ आणि २० जुलै) पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, रविवारपासून तीन दिवसांपासून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मयेत वडाचे झाड घरावर कोसळून नुकसान, दोन कारसह तीन दुचाकी चिरडल्या

मयेत जीर्ण आणि अवाढव्य वडाचे झाड घरावर कोसळले. घरासमोर पार्क केलेल्या दोन कारसह तीन दुचाकी चिरडल्या. मध्यरात्री झाड कोसळल्याने जीवीतहानी टळली. वीस लाखांहून अधिक मालमत्तेची हानी झाल्याचा अंदाज. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

SCROLL FOR NEXT