गोवा

Goa Todays Live News: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी!

Manish Jadhav

दुर्देवी! 'त्या' युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू

रविवारी सकाळी पणजी मेरी इमॅक्युलेट चर्चजवळील पालिका उद्यानाकडे रस्त्याशेजारील झाड पडून जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान जीएमसीत निधन. आरती गोंड (वय 19) असे त्या मयत युवतीचे नाव आहे.

बेतोडा-बोरी बायपास रस्त्यावर ट्रकचा अपघात

बेतोडा-बोरी येथील बायपास रस्त्यावर चालकाचा ताबा ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल.

कुठ्ठाळीत दरड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान!

कुठ्ठाळी येथे दरड कोसळल्याने क्लिप वाझ यांच्या घराचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार संकल्प आमोणकर आणि अंतोन वाझ यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे लोकही घटनास्थळी पोहोचले.

पर्यटन धोरणाच्या मसुद्याला एकमताने विरोध

हळदोणा ग्रामसभेत पर्यट धोरणाच्या मसुद्याला एकमताने विरोध करण्यात आला आहे. तसेच देवनागरी लिपीसोबत रोमन लिपीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळवण्याचा ठराव मांडला.

गोवा हद्दीतील समुद्रात जहाजाला लागलेली आग अद्याप आटोक्यात नाही- मनोज भाटिया

श्रीलंकेकडे निघालेल्या मालवाहू जहाजाला गोवा हद्दीतील समुद्रात आग लागली. आग अद्याप धूमसत असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आग नियंत्रणात असली तरी पूर्णपणे आटोक्यात नाही. शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे कोरडी रासायनिक पावडर पसरवल्याने आग आटोक्यात आली. भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटियांची माहिती.

Sunburn Festival: वेळसाव पंचायतीचा सनबर्न फेस्टिव्हलला विरोध

वेळसाव पंचायतीने दक्षिण गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करत रोमन लिपीला समान दर्जा देण्यास पाठिंबा देण्याचा मांडला ठराव. दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

Karapur Sarvan Panchayat: अभिनंदन लोढांच्या मेगा प्रकल्पाच्या विरोधाची धार मवाळ!

कारापूर सर्वण पंचायतीला MRF शेडसाठी जागा दिल्याबद्दल पंचायत मंडळाकडून मंत्री विश्वजीत राणे आणि प्रतापसिंह राणेंचे अभिनंदन. अभिनंदन लोढा मेगा हाऊसिंग प्रकल्पासाठीची जागा खुद्द 'बाबांची' असा पंचायत मंडळाचा युक्तिवाद. ग्रामस्थांकडून प्रकल्पाविरुद्ध विरोधाची धारही मवाळ.

Karapur Sarvan Panchayat: अभिनंदन लोढांच्या मेगा बांधकाम प्रकल्पासाठी पंचायतीची एनओसी नाही!

कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक 148/0तील 4 लाख 26 हजार स्क्वेअर मीटर जमिनीत फक्त प्लॉट करण्यासाठी पंचायतीने एनओसी दिलेली आहे. मेगा बांधकाम प्रकल्पासाठी पंचायतीकडे एनओसीसाठी अर्ज आलेला नाही आणि पंचायतीने एनओसी दिलेली नाही. कारापूर सर्वण पंचायत मंडळाची ग्रामसभेत माहिती.

Goa Crime: मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याप्रकरणी एकास अटक

मांद्रे येथील ब्राम्हण देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यात आली. आता याप्रकरणी मांद्रे पोलिसांकडून दीपक पांडू निकम ( 35, राहणार पेडणे, मूळ महाराष्ट्र) याला अटक करण्यात आली आहे.

Goa News: कारापूर-सवर्ण ग्रामसभा 'एनओसी' च्या मुद्यावरुन तापली

कारापूर-सर्वणच्या ग्रामसभेत सुरुवातीलाच विठ्ठलापूर येथील मिनरल वॉटर प्रकल्पाला दिलेल्या 'एनओसी'चा मुद्दा तापला. पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT