Goa Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Goa Today's Top News: भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल, काँग्रेसचा रामनवमीचा मुहूर्त; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 16 April 2024 Live News Update: लोकसभा निवडणूक, राजकारण, गुन्हे, क्रीडा, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या राज्यातील ठळक घडामोडी.

Pramod Yadav

राम नवमीला काँग्रेस उमेदवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

Goa Loksabha Election

राम नवमीला (बुधवार, दि.17) गोव्यातील काँग्रेस लोकसभा उमेदवार, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ताळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य वाहतुकीस बंदी

ताळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत क्षेत्र परिसरात 27, 28, 29 एप्रिल रोजी मद्य वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

सात दिवसात युरी आलेमाव यांनी जाहीररित्या माफी मागावी

भंडारी समाजाचे नेते जित आरोलकर यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केलेले विधान भंडारी समाज खपवून घेणार नाही.

येत्या सात दिवसात युरी आलेमाव यांनी जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी गोमंतक भंडारी समाज युवा समितीने पत्रकार परिषदेत केली.

ऑडिट भवन- पर्वरी येथे आढळला तरुणाचा मृतदेह

ऑडिट भवन- पर्वरी येथे तरुणाचा मृतदेह आढळला असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उत्तर गोव्यातून अ‍ॅड. विशाल नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Goa Loksabha

उत्तर गोव्यातून लोकसभेसाठी अ‍ॅड. विशाल नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गोव्यात कार्यरत महाराष्ट्र, कर्नाटकातील कामगारांना 26 एप्रिल रोजी भरपगारी सुट्टी

Holiday On Polling

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकात होणाऱ्या मतदानासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातील कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

श्रीपाद भाऊंचाही अर्ज दाखल

Shripad Naik Files Nomination

दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी नाईक यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री विश्वजीत राणे, आमदार देविया राणे उपस्थित होत्या.

Shripad Naik Files Nomination

कामत, सिक्वेरा, ढवळीकर आणि रवी नाईक डिस्चार्ज झालेल्या बॅटऱ्या, भाजपचा पराभव अटळ - काँग्रेस

"डबल पॉवरची दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, सुदिन ढवळीकर आणि रवी नाईक यांच्याकडून अपेक्षा धरणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी त्या चौघांची बॅटरी डिस्चार्ज होवून कधीच निकामी झाल्याचे लक्षात घेतले पाहिजे. भाजपचा पराभव अटळ आहे," असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

एप्रिलच्या 15 दिवसांत गोव्यात 19 अपघातील मृत्यू

Goa Accident Deaths

एप्रिलच्या 15 दिवसांत गोव्यात 19 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरवड्यात राज्यात सुमारे शंभर अपघात झाल्याचे समोर आले आहे. किलर स्टेट अशी ओळख झालेल्या गोव्यात मागील 105 दिवसांत 99 जणांचा बळी गेला आहे.

भाजपचे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Goa Loksabha

गोव्यातील भाजपचे दोन्ही लोकसभा उमेदवार आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

Pallavi Dempo

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT