Waterfalls in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: 'कळसकोंड' धबधब्यावर प्रवेशबंदी, म्हादईचा मुद्दा; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 01 July 2024 Live News: आसगाव घर मोडतोड प्रकरण, पोलिस महासंचालकांची बदली, गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा यासह राज्यातील ठळक बातम्या.

Pramod Yadav

'कळसकोंड' धबधब्यावर प्रवेशबंदी..!

लाडफे-डिचोली येथील 'कळसकोंड' धबधबा यंदाही पर्यटनासाठी बंद. देवस्थान समितीचा निर्णय. धिंगाणा आणि धबधब्याचे पावित्र्य जपण्यासाठी प्रवेशबंदी.

Mahadayi Water Disputes:... तर 'म्हादई' वाचवता येणे शक्य; युरी आलेमाव

म्हादई'च्या संरक्षणार्थ सरकार आवश्यक पावले उचलत नसल्याचा सूर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी पुन्हा आळवला आहे. 'प्रवाह'चे सदस्य 05 जुलैपासून म्हादई खोऱ्याची पाहणी करणार आहेत. गोवा सरकारने व्याघ्र प्रकल्प जाहीर केला तरच 'म्हादई' वाचवता येणे शक्य आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

म्हादई नदी ही गोव्याची जीवनदायिनी आहे. केंद्राने कर्नाटकला केलेल्या सहकार्यामुळे गोव्यातील तिचे अस्तित्व संकटात आले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याची गरज आहे, असेही आलेमाव म्हणाले.

येत्या अधिवेशनात या मुद्यावर विरोधक आक्रमक असतील, असेही त्यांनी संकेत दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सरकार म्हादई संदर्भात गंभीर असल्याचे म्हटले आहे.

Assagao Case: पूजा शर्माच्या जामीन अर्जावर 3 जूलैला सुनावणी!

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील संशयीत पूजा शर्माच्या जामीन अर्जावर 3 जूलै रोजी सुनावणी. पूजा शर्माच्या अर्जावर पणजी सत्र न्यायालयाने मागितले एसआयटीकडे उत्तर.

सांगोल्डातील पाण्याची पाइपलाइन फुटली

सांगोल्डातील आरडी, गिरी प्रभाग क्रमांक 9 येथील पाण्याची पाइपलाइन फुटली. आमदार केदार नाईक यांनी सहायक अभियंता यांना तपासणीसाठी बोलावले. उद्या (2 जुलै) पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे पंच सदस्या दलिनी फ्रँको यांनी सांगितले.

E- Buses In Panjim: राजधानी पणजीत धावणार सहा इलेक्ट्रिक बस

राजधानी पणजीत आजपासून धावणार सहा इलेक्ट्रिक बस. पुढील काही दिवसात आणखी बसचा होणार समावेश. एकूण 48 इलेक्ट्रिक बस पणजीत करणार सुरू.

Chorao Ferry Boat: चोडण फेरी धक्यावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली, मृत कर्नाटकचा रहिवासी

मांडवी नदीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला. कुटुंबायांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव श्री. मोदीन नबीसाब अत्तार ( वय 28 वर्षे विजापूर, कर्नाटक). मृताच्या बहिणीने माहिती दिलेल्या माहितीनुसार ती व्यक्ति शनिवार संध्याकाळपासून बेपत्ता होती आणि हरवल्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली होती.

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरण; अटकपूर्व जामिनासाठी पूजा शर्माचा अर्ज

आसगाव येथील आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी पणजी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी तिला क्राइम ब्रांचच्या एसआयटीने चौकशीसाठी आज १ जुलै रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते मात्र ती हजर राहिली नाही.

पाल उसगाव येथे रस्त्यावर कोसळले झाड.

पाल उसगाव येथे रस्त्यावर कोसळले झाड. दुहेरी मार्ग असल्याने एकेरी मार्गातून वाहतुकची ये जा. अग्निशामक दलाला पाचारण.

Bharatiya Nyaya Sanhita: तीन नवे कायदे आजपासून लागू, मुख्य सचिवांच्या हस्ते पणजीत उद्घाटन

तीन नव्या कायद्यांचे राज्याचे मुख्य सचिव पुनीत गोएल यांच्या हस्ते उद्घाटन. पणजी येथील पोलिस स्थानकात पार पडला कार्यक्रम. देशात आजपासून तीन नवे कायदे लागू करण्यात आले आहेत.

उसगांव पंचायतीचे नव्या इमारतीत स्थलांतर!

उसगांव पंचायतीचे कार्यालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर. एमआरएफ कंपनीचे सरव्यवस्थापक गौतम राज यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी पंचायत मंडळाची उपस्थिती.

Mahadei River: वचन द्या की हे असंवेदनशील सरकार म्हादई विकणार नाही - विजय सरदेसाई

गोव्याचे भाजप सरकार अजूनही खोटे बोलून निर्लज्जपणे गोमंतकीयांची फसवणूक करत आहे. म्हादईचा प्रश्न योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी कर्नाटक सरकार सर्वोच्च स्तरावर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ देखील उभे करता आले नाही.

मागील विधानसभेतील मी केलेल्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपानंतर सभागृह समिती स्थापन करण्यात आली, परंतु गोवा सरकार एवढे नपुंसक किंवा त्यांच्या हँडलर्सच्या अधीन गेले आहे की त्यांना एकदाच बोलावण्यात आले. म्हादई प्रत्येक गोमंतकीयासाठी पवित्र आहे आणि त्यांना वचन द्या की हे असंवेदनशील सरकार म्हादई विकणार नाही.

Goa Accident: सरकारी खात्यांचा ब्लेम गेम, उसगावात अपघात सुरुच

उसगांव राष्ट्रीय महामार्गावर खुर्साकडे येथे दुचाकीची गायीला धडक. रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने अपघात. स्ट्रीट लाईट नसण्यावर हायवे अथॉरिटी आणि वीज खात्यात ब्लेम गेम सुरू, स्थानिकांचा आरोप.

Ashadhi Wari 2024: पाऊले चालती पंढरीची वाट..!

विठ्ठलनामाचा जयघोष करीत मुळगावहून 250 वारकऱ्यांनी धरली पंढरपूरची वाट. तेरा दिवस करणार पायी प्रवास. आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरी भरणाऱ्या विठ्ठलभक्तांच्या मेळ्यात होणार सहभागी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT