Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

गोव्यात प्रामाणिक राजकारणाची सुरुवात : अरविंद केजरीवाल

गोव्यातील आपच्या विजयी उमेदवारांचं ट्विट करत केजरीवालांकडून अभिनंदन

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत आपलं खातं खोललं आहे. गोव्यात आपला दोन जागांवर विजय मिळाला आहे, तर तीन ठिकाणी आपला आघाडी दिसत होती. अरविंद केजरीवालांनी या निकालांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. गोव्यात प्रामाणिक राजकारणाची सुरुवात होते आहे, असं वक्तव्य केजरीवालांनी केलं आहे. केजरीवालांनी ट्विट केलं आहे की, आपने गोव्यात दोन जाहा जिंकल्या आहेत. कॅप्टन वेंझी आणि एर क्रूझ यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. ही गोव्यात प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे.

दरम्यान आपच्या नेत्या आतिशी यांना बाणावली आणि वेळ्ळीमध्ये वेंझी व्हीएगस आणि क्रूझ सिल्वा यांनी विजय मिळवत आपला गोव्याच्या राजकारणात प्रवेश मिळवून दिला आहे. आतिशी यांनीही ट्विट करत दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. वेंझी व्हिएगस यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) चर्चिल आलेमाव आणि काँग्रेसच्या (Congress) अंतोनिओ डायस यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. चर्चिल आलेमाव यांना 5140 मतं मिळाली तर डायस यांना 4697 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. वेंझी व्हिएगस यांना 6411 मतं मिळाली असून ते 1271 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

गोव्यात आपचे (Aam Aadmi Party) मुख्यंमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. आम आदमी पक्षाचं भंडारी समाजाचं व्होट कार्ड कामी आलं नसल्याचं चित्र आहे. भंडारी समाजाचे उमेदवार देऊनही त्यांना गोव्यात म्हणावं तसं यश आलं नाही. मात्र पंजाबमध्ये मात्र आपने काँग्रेससह भाजपचा सुपडासाफ केला आहे. आम आदमी पक्षाचे भगवंत मान 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मान यांचा 16 मार्चला अमृतसरमध्ये रोड शो होणार आहे. मान यांनी अरविंद केजरीवाल यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aaroshi Govekar: .. ऐसी धाकड है! गोव्याच्या 'आरोशी'ची भारतीय फुटबॉल संघात निवड; नेपाळविरुद्ध पदार्पणाची संधी

Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Marathi Official Language: 'शाळेतून मराठीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न'! वेलिंगकरांचा आरोप; 2027 च्या निवडणुकीत पडसाद दिसतील असा इशारा

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

SCROLL FOR NEXT