Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'मिडल ईस्ट' मध्ये धमाका! आंतरराष्ट्रीय पर्यटकांसोबत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटनाकडून दोहा, मस्कतमध्ये रोड शो

Goa Roadshow In Doha And Muscat: पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दोहा आणि मस्कत येथे रोड शो आयोजित केला.

Manish Jadhav

Goa to Organize Roadshows in Doha and Muscat Ahead of Arabian Travel Market 2025

गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्याने ओळख निर्माण करुन देण्यासाठी गोवा सरकारने सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सरकार वेगवेगळ्या देशांशी पर्यटनासंबंधी करार देखील करत आहेत. यातच आता, दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणाऱ्या अरेबियन ट्रॅव्हल मार्केट 2025 मध्ये सहभागी होण्याआगोदर गोवा पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला. पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दोहा आणि मस्कत येथे रोड शो आयोजित केला.

दरम्यान, गोवा पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कतार आणि ओमानमधील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर या भागदारांशी चर्चा केली. कतारमधील भारताचे राजदूत विपुल हे कतारमधील रोड शोमध्ये सहभागी झाले, जिथे त्यांनी जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या गोव्याच्या क्षमतेबाबत भाष्य केले.

भारत आणि कतार संबंध

भारत (India) आणि कतारमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षात खूप प्रयत्न झाले आहेत. भारत हा नेहमीच कतारसाठी पर्यटनाच्या (Tourism) बाबतीत टॉपवर राहिला आहे. दरम्यान, या रोड शोचे उद्दिष्ट केवळ पर्यटनाला चालना देणे नसून गुंतवणूकदारांना आकर्षित करणे देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. या रोड शोमध्ये गोवा पर्यटन शिष्टमंडळात गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखीजा, चार्टर ऑपरेटर, हॉटेल व्यावसायिक आणि ट्रॅव्हल एजंट सहभागी झाले.

दुसरीकडे, मस्कत येथे भारतीय दूतावासातील उपप्रमुख तविशी बहल रोड शोमध्ये सामील झाल्या. यावेळी त्यांनी गोवा आणि ओमानमधील वाढत्या पर्यटन आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आरोलकर यांनी सांगितले की, ''आम्ही ओमान आणि गोवा यांच्यातील पर्यटन सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या रोड शोने केवळ दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठीच नाहीतर कनेक्टिव्हिटी आणि नव्याने पर्यटन अनुभव देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे,"

दरम्यान, 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान दुबई येथे होणाऱ्या एटीएम 2025 मध्ये गोवा सहभागी होणार आहे. मध्य पूर्वेत आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT