Panjim | Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Health Care App: ‘एआय ॲप’वर मिळणार हेल्थ रिपोर्ट; गोवा ठरणार आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांना सेवा देणारे पहिले राज्य!

Health Minister Vishwajit Rane: रुग्णांची काळजी घेण्यासाठी २४ तास घरी राहणे कधी कधी कुटुंबीयांना शक्य होत नाही. अशावेळी काळजीवाहक (केअर टेकर) ठेवले जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा सरकार उत्तम आरोग्य सेवा देण्यावर भर देत असून देशात पहिल्यांदाच ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ॲप पुढील दोन महिन्यांत लाँच करणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. देशात सर्वांत प्रथम गोवा सरकार ही सेवा रुग्णांना पुरविणार आहे. यासंदर्भात संबंधित कंपनीशी लवकरच सामंजस्य करार होणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत मंत्री राणे म्हणाले की, हे ॲप लोकांना फायदेशीर ठरणार आहे. रक्त तपासल्यावर त्याचे पूर्ण अहवाल आम्हाला मिळतात; पण बऱ्याचदा रुग्णांना काळजी कशी घ्यावी, हे कळत नाही. ही माहिती या ॲपद्वारे देण्यात येणार आहे. रक्त चाचणीचे अहवाल ॲपवर अपलोड केले की, ॲप सविस्तर माहिती आणि कशी काळजी घ्यावी, हे सांगेल. त्यासाठी हे अँप फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

रुग्णांची काळजी घेण्यासाठी २४ तास घरी राहणे कधी कधी कुटुंबीयांना शक्य होत नाही. अशावेळी काळजीवाहक (केअर टेकर) ठेवले जातात. अशा काळजीवाहकांची नोंदणी करून त्यांचा अहवाल तयार करण्याची सूचना गोमेकॉ प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

मॉलीक्युलर लॅब गरजेची

कर्करोग तपासणीसाठी रक्तचाचणी वेळेत झाली तर रुग्णांवर योग्य उपचार होऊ शकतात. त्यासाठी मॉलीक्युलर लॅब स्थापन करणे अनिवार्य आहे. ही लॅब लवकर स्थापन करून इथेच चाचणी करून लवकरात लवकर कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यात येतील, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

या ॲपचा वापर मी स्वत: केला आहे. मी माझे अहवाल अपलोड केले आणि डॉक्टरांनी दिलेले अहवाल तपासले. दोन्ही अहवालांमध्ये फरक नव्हता. त्यामुळे एआय ॲपआधारित जे तंत्रज्ञान आम्ही गोमंतकीयांना देऊ पाहात आहोत, ते योग्य प्रकारे काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

SCROLL FOR NEXT