Vishwajit Rane: तुये - पेडणे येथे सुसज्ज ‘हेल्थ केअर हब’ तयार करणे हे आपले ध्येय; विश्वजीत राणे

Vishwajit Rane: कर्करोग तपासणी अभियान संपूर्ण गोव्यात कर्करोग शोधण्यात आणि लवकरात लवकर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे
Vishwajit Rane: कर्करोग तपासणी अभियान संपूर्ण गोव्यात कर्करोग शोधण्यात आणि लवकरात लवकर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: समाजाला प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी तुये - पेडणे येथे ‘हेल्थ केअर हब’ तयार करून तो सर्वोत्तम सुविधांनी सुसज्ज करणे हे आपले ध्येय आहे. तुये इस्पितळाला उपजिल्हा सुविधेत श्रेणीसुधारित करण्याची आमची योजना आहे. पेडणे तालुक्यातील लोकांना सुलभ आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, की एकदा इस्पितळ आरोग्य सेवा संचालनालयाकडे सुपूर्द केल्यानंतर ते इस्पितळ बनवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या दिशेने आम्ही काम करणार आहोत. हे इस्पितळ तयार झाल्यावर उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयावरील भार कमी होईल याची खात्री करून पूर्णपणे तुये येथील इस्पितळ कार्यान्वित केले जाईल.

आमचे ध्येय तुये येथे आरोग्य सेवा केंद्र तयार करणे आहे. सर्वोत्तम सुविधांनी सुसज्ज, समाजाची प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने सेवा करणे तसेच गोव्यातील आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आरोग्य खाते समर्पित आहे. प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घराजवळ आवश्यक असलेली वैद्यकीय सेवा मिळण्याची खात्री आम्ही करणार आहोत, असे मंत्री राणे म्हणाले.

Vishwajit Rane: कर्करोग तपासणी अभियान संपूर्ण गोव्यात कर्करोग शोधण्यात आणि लवकरात लवकर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे
Vishwajit Rane : विश्वजीत राणे दामोदर चरणी लीन!

वाळपईत ४ संशयित स्तनाच्या कर्करुग्णांची प्रकरणे

मंत्री राणे म्हणाले की, कर्करोग तपासणी अभियान संपूर्ण गोव्यात कर्करोग शोधण्यात आणि लवकरात लवकर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कर्करोग स्क्रीनिंग व्हॅन, प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि शेकडो व्यक्तींना तोंड, स्तन, गर्भाशय ग्रीवा आणि जीआय कर्करोगासाठी मोफत तपासणी सेवा पुरवित आहे. सामाजिक आरोग्य केंद्र वाळपई येथे नुकत्याच झालेल्या मोहिमेदरम्यान २२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ संशयित स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे आढळली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com