Indore Goa Direct Flight
पणजी: गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. देशांतर्गत विविध प्रमुख शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरु केली जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर देशातून येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता विमानसेवा सुरु केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील मुख्य शहरांतून गोव्याला विमानसेवा पुरवली जाते. याता आता उत्तर भारतातील राज्य देखील मागे नाहीत. इंदूरमधून गोव्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने विमानसेवेची घोषणा केली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस येत्या १५ एप्रिलपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु करत आहे. यामुळे इंदूरच्या आहिल्यादेवी होळकर विमानतळावरुन उत्तर गोव्यातील मनोहर विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कंपनीने १७२ सीटांचे बाईंग ७३७ मॅक्स विमान यासाठी सज्ज केले आहे. यात १५८ इकॉनॉमी सीट असणारेत, अशी माहिती समोर आली आहे.
वेळापत्रक (Goa Indore Flight Timetable)
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी १०.०५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि सकाळी ११.४० वाजता इंदूर येथील आहिल्याबाई होळकर विमानतळावर उतरेल. तसेच, इंदूर या विमानतळावरुन विमान दुपारी १२.१० मिनिटांनी उड्डाण घेईल आणि दुपारी १.४५ मिनिटांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. येत्या १५ एप्रिलपासून ही विमानसेवा सुरु होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भाडे किती असणार? (Indore Goa Flight Airfare)
इंदूर ते गोवा या विमानसेवेसाठी प्राथमिक भाडे ४,५०० रुपये असल्याची माहिती आहे. दरम्यान, यात सेवा आणि क्लासनुसार बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, विविध ऑनलाईन तिकिट बुकिंग सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तिकिटात फरक आढळू शकतो. गोवा ते इंदूर हे अंतर केवळ दीड तासांत पूर्ण होणार असल्याने दोन्ही राज्यात प्रवास करणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय पर्यटनाला देखील चालना मिळण्यास मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.