Welfare Schemes: लोकांचे सामाजिक योजनांचे थकलेले पैसे तत्‍काळ द्या! मुख्यमंत्र्यांचे निर्देश; आधार प्रणाली वापरण्याची सूचना

CM Pramod Sawant: आधार-आधारीत पेमेंट प्रणालीच्या अंमलबजावणीला गती द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या वित्त पुनरावलोकन बैठकीत केली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantX
Published on
Updated on

Welfare Scheme Payment In Goa

पणजी: दीनदयाळ सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी, गृहआधार, कलाकार साहाय्यता आणि सामाजिक कल्याण आदी योजनांची थकबाकी असलेला लाभ तत्काळ देण्यात यावा. योजनेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी आधार-आधारीत पेमेंट प्रणालीच्या अंमलबजावणीला गती द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या वित्त पुनरावलोकन बैठकीत केली.

या बैठकीस मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस आणि विभागप्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या बैठकीत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींच्या वापराचे पुनरावलोकन आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला.

तसेच केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी व राज्यात लागू करता येणाऱ्या नवीन केंद्रीय योजनांचा आढावा घेतला. राज्याच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पाची तयारीचाही आढावा घेण्यात आला.

CM Pramod Sawant
DSSS: 'दयानंद सुरक्षा' योजनेसाठी 2101 लाभार्थी अपात्र; 6800 जणांची नावे वगळली

दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याची मुख्यमंत्र्यांनी सूचना केली. विविध ऑनलाईन सेवांचे पुनरावलोकन आणि नव्या सेवा ऑनलाईन मोडमध्ये जोडण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला. हरित अर्थसंकल्प आणि कचरा व्यवस्थापन, पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, वेळेच्या चौकटीत पूर्ण होणाऱ्या ऑनलाईन सेवा अधिक सक्षम करणे व राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यावर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले की, सरकार नागरिकांकडून मिळालेल्या सूचना व अभिप्राय विचारात घेईल आणि राज्याच्या दीर्घकालीन विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करेल.

CM Pramod Sawant
'डीडीएसएसवाय' अंतर्गत होणाऱ्या कोविड उपचारांना तूर्त स्थगिती

तब्‍बल सहा हजार मृत लाभार्थी

सहा हजार मृत लाभार्थ्यांची नावे दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यांच्या बँक खात्यांवर या योजनेचे पैसे त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतरही जमा होत होते अशी धक्कादायक माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. ते म्हणाले, खात्याने लाभार्थी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. त्‍यातून ही बाब उघड झाली आहे. अशा लाभार्थ्यांच्या खात्यांतून तब्‍बल १२ कोटी रुपयांची वसुली करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com