Goa To Hyderabad Interstate Bus Overturns At Dharbandora Dainik Gomantak
गोवा

Bus Accident Goa: पणजीहून हैदराबादला जाणाऱ्या बसला भीषण अपघात; 1 ठार 25 जखमी

धारबांदोडा येथील घटना; खड्ड्यात कलंडली

दैनिक गोमन्तक

Hyderabad Bound Bus Overturns In Goa: पणजीहून हैदराबादला जाणाऱ्या तेलंगण राज्यातील बसगाडीला दुर्गिणी - धारबांदोडा येथील आमिगोस हॉटेलजवळ भीषण अपघात होऊन चालक शेखरगौडा निंजन गौडा पाटील (वय ४९) हा जागीच ठार झाला. तो मूळ आदरगुंची - धारवाड - कर्नाटक येथील रहिवासी आहे.

या अपघातात अन्य 25 जण जखमी झाले. जखमींपैकी नऊजणांना बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आले तर इतर सोळाजणांवर धारबांदोडा पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार करण्यात आले.

त्यातील काहीजणांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करून डिस्चार्ज देण्यात आला. हा अपघात आज संध्याकाळी सव्वापाच वाजता झाला.

टीएस १२ युडी ९७०७ या क्रमांकाची गौतमी ट्रॅव्हल्सची बसगाडी पणजीहून हैदराबादला निघाली असता, चालकाचे बसगाडीवरील नियंत्रण सुटल्याने वळणावर ही बसगाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली.

आणखी पुढे गेली असती, तर बसगाडी ओहोळात कोसळली असती. बसगाडीत यावेळेला ३२ प्रवासी तसेच तीन चालक होते. भरधाव बसगाडीला अचानक अपघात होऊन एका बाजूला कलंडल्याने प्रवाशांनी आरडाओरड केली.

त्यावेळी तेथून जाणाऱ्या इतर वाहनातील लोकांनी व स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बसचा चालक गाडीखाली सापडला होता, तर इतरांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या.

विव्हळत पडलेले प्रवासी आणि बसच्या खाली सापडलेला चालक असे विदारक दृश्य अपघातस्थळी दिसले. या अपघातप्रकरणी अग्निशमन दल तसेच पोलिसांना कळविण्यात आल्यावर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. फोंडा, सावर्डे व इतर भागातील रुग्णवाहिकांतून जखमींना इस्पितळात पोचवण्यात आले.

बसमधील प्रवाशांत तीन म्हापसा येथील, पणजीतील नऊ, हुबळीतील आठ व धारवाड येथील एका प्रवाशाचा समावेश होता. बसमधील प्रवाशांनी बसचा चालक गाडी व्यवस्थित चालवत नव्हता, अशा प्रतिक्रिया दिल्या. या अपघातप्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

चालकाने वळण पाहिलेच नाही...

दुर्गिणी - धारबांदोडा येथील आमिगोस हॉटेलजवळील एकेरी मार्गावर असलेले वळण चालकाने पाहिलेच नाही. भरधाव बसगाडी त्याने सरळ पुढे नेली आणि ती एका बाजूला कलंडली. बसगाडी घसरतच पुढे झाडांना ठोकर देत खड्ड्यात एका बाजूला कोसळली.

यावेळेला तेथून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी व स्थानिकांनी हा अपघात पाहून घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रडारड आणि आरडाओरड यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता.

फोंडा व धारबांदोडा तालुक्यातील सर्व १०८ रुग्णवाहिका तसेच पोलिस जीपगाड्या अपघातस्थळी आल्यानंतर जखमींना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, बसखाली सापडलेल्या चालकाला बस एका बाजूला उचलून बाहेर काढण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

९ गंभीर जखमी बांबोळी इस्पितळात

या अपघातातील नऊ गंभीर जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.

त्यात वामशी मुशरी (वय २३), श्‍वेता गदाम (वय २२), लिप्पस्वामी पिल्लई (वय २६), अर्चना व्ही (वय २५), आशिश सिरना (वय २१), साईच्छा लाडमतिनी (वय २५), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय २१), सौम्या कोटार (वय २४) व शिवराम रेड्डी (वय ४०) यांचा समावेश आहे.

इतर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अनेक प्रवाशांचे हात - पाय फ्रॅक्चर...

या अपघातात नऊजणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यातील सहाजणांचे कुणाचे पाय, कुणाचे हात, तर कुणाचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे.

बसमधून या जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांची आरडाओरड करायला सुरवात केली. अपघातस्थळी रक्त सांडल्याचे तसेच दुखापतीमुळे विव्हळणाऱ्या प्रवाशांचे विदारक दृश्य दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT