Ambedkar Bhavan Goa
पणजी: आपले सरकार 'अंत्योदय' तत्त्वावर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पर्वरीत आंबेडकर भवन उभारण्याची मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी २१४० चौरस मीटर जमीन घेण्यात आली असून १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत पायाभरणी करून सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
येथील कदंब बसस्थानकाजवळील आंबेडकर उद्यानात 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्य सचिव डॉ. कांदावेलू, जिल्हाधिकारी स्नेहा गीते, संचालक अजित पंचवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला भारत देश स्वातंत्र्याच्या शतकोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत असताना समाजात अस्पृश्य ही संकल्पनाच राहता कामा नये. आम्ही सर्वजण भारतीय असून सर्व एक आहोत ही भावना रूजवणे गरजेचे आहे.डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
'ती' घरे नियमित करणार
अनेक समाजबांधवांना 'अटल आसरा' योजनेअंतर्गत घरे बांधण्यास जमिनीचा अडचणी येत आहेत. १९७१ पूर्वीची ज्यांची घरे आहेत, त्यांना मुंडकार हक्काखाली दावा करता येईल. अशा घरांना नियमित करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्यासोबतच एसस्सी, एसटी समाजातील बांधवांच्या बढतीच्या समस्या आहे. वार्षिक तीन बैठका घेत न्याय देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री सांवत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.