Mumbai Goa Highway: गांजा ओढतोय! मुंबई - गोवा महामार्गावर नशेत पडलेल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला अटक

Sindhudurg Crime News: पोलिसांनी संशयित शिक्षक पाटील यांना येथे काय करताय अशी विचारणा केली असता गांजा ओढतोय, असे उत्तरे त्याने दिले.
Mumbai Goa highway teacher intoxicated
Teacher arrested for DrugDainik Gomantak
Published on
Updated on

कुडाळ: अमली पदार्थ गांजाचे सेवन करुन नशेत पडलेल्या सावंतवाडीतील प्राथमिक शिक्षकाला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई - गोवा महामार्गावर झाराप येथे शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कुडाळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद शिक्षकाला अटक केली आहे.

विनायक रामचंद्र पाटील (वय ३४, रा. चंदगड, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मुंबई - गोवा महामार्ग वरील झाराप येथे पेट्रोलपंपाजवळ एक व्यक्ती नशेत पडल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता संशयित पाटील नशेत पडल्याचे आढळून आले.

Mumbai Goa highway teacher intoxicated
Goa Crime: दारूच्या नशेत पत्नीसोबत वाद, मृतदेहाजवळ रक्ताचे डाग; गोवा मेडिकल कॉलेजबाहेर आढळला अज्ञात मृतदेह

पोलिसांनी संशयित शिक्षक पाटील यांना येथे काय करताय अशी विचारणा केली असता गांजा ओढतोय, असे उत्तरे त्याने दिले. पोलिसांनी पाटील यांच्या विरोधात अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक विनायक रामचंद्र पाटील सावंतवाडीतील एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ममता जाधव करत आहेत.

निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती चिंता

सावंतवाडी, दोडामार्ग भागात गांजासह इतर अमली पदार्थांची तस्करी वाढल्याप्रकरणी आमदार निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. जिल्ह्यात अशा प्रकरच्या घटना आणि तस्करीला आळा घालण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com